प्रश्न कमल- कितीही कमावले तरी द्विधा मनस्थिती असते?
उत्तर- आपल्या कुंडली तील रविवर हर्षल चा प्रभाव असल्याने असे होत आहे. आपण प्राणायाम दीर्घ श्वसन नियमित करावे. कुठे थांबायचे हे कळण्याची कला एकदा जमली की तिथून समाधान सुरू होते.
प्रश्न पद्मा- मी इतरांकडून खूप अपेक्षा ठेवते. त्यामुळे बरेचदा वादाचे प्रसंग होतात?
उत्तर- आपल्या कुंडलीनुसार शंखपाल प्रकारचा कालसर्प योग आहे. आपण शेवट वागावे. इतरांना आपली मदत कशी होईल, या दृष्टीने सतत प्रयत्नशील असावे.
….
वास्तू टीप्स-
अडगळीची खोली वायव्य दिशेला असावी. तसेच दक्षिण पश्चिम अथवा नैऋत्य दिशेला मोठ्या ओपनिंग म्हणजेच फ्रेंच डोअर्स टाळावेत…
देव्हारा टीप-
देवा जवळचा नंदादीप हा तिळाच्या तेलात असावा तसेच फुलवाती गाईच्या तुपात भिजवावेत.
रत्न टीप- सिलोन नीलम रत्न घेतल्यावर काही दिवस ते आपल्या सोबत बाळगावे. लाभात अनुभवून मगच अंगठीत घडवावे.
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा असल्याने शुभ कार्य टाळावीत.
—
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.