आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ५ फेब्रुवारी २०२१
मेष – व्यवहारात कटुता टाळा
वृषभ – अपेक्षापूर्ती होईल
मिथुन – अनामिक चिंता सतावेल
कर्क – फायद्याची गुंतवणूक
सिंह – खर्चाचा ताळमेळ अवघड
कन्या – काळ काम आणि वेग असे नियोजन करावे
तूळ – परिचीतांची नाराजी टाळावी
वृश्चिक – अर्जंट की इम्पॉर्टंट. कामे ठरवावी
धनु – फायद्याच्या संकल्पना सुचतील
मकर – वेळेचा आदर करा
कुंभ – नवीन ओळखी फायद्याच्या
मीन – प्लॅनिंग मधील गोंधळ टाळा
….
शंकासमाधान
प्रश्न – जयवंत – सही वरून व्यक्तिमत्व अंदाज कसा करतात?
उत्तर- सही वरून व्यक्तिमत्त्वाचा अंदाज करण्याच्या माझ्या स्वतःच्या काही टिप्स आहेत. त्यातील सहीचे तीन-चार प्रकार व स्वभावातील १ गुण बघू. फराटे दार लांबलचक सही असणारी व्यक्ती खाऊन पिऊन सुखी असते. सहीच्या सुरुवातीचे अक्षर मोठे नंतर निमुळती होत जाणारी सही असल्यास अशा व्यक्तीने कोणालाही शब्द देताना विचार करावा. सही झाल्यावर खाली रेष करायची सवय असल्यास अशी व्यक्ती चांगली मार्गदर्शक बनते. सही खाली २/३ डॉट देण्याची सवय असल्यास अशी व्यक्ती व्यवहारात पक्की असते. गुंतागुंतीच्या अक्षरांची सही असल्यास लवकर मन मोकळे करत नाही. अगदी छोटीशी सही असल्यास मित्र परिवार कमी असतो, कारण हे लोक अबोल असतात. खालून वर जाणारी सही अक्षरे असल्यास कोणाला, कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाहीत. पण काम करतील की नाही सांगता येत नाही. प्रमाणापेक्षा मोठ्या आकारातील, अक्षरातील सही असणाऱ्यांची कोणती गोष्ट खाजगी राहिलेली नसते. परफेक्ट गोलाकार आकारातील अक्षरांची सही असल्यास स्वतःच्या पसंतीनेच प्रत्येक गोष्ट करतात. शेवटच्या अक्षराची खालची रेघ वळवुन पुन्हा सही खाली घेतल्यास अपमानाची यथावकाश पुरेपूर परतफेड करतात. अशा हजारो प्रकारच्या सह्यांचे अभ्यासातून अतिशय सविस्तर व्यक्तिमत्त्व विश्लेषण तज्ञांना करता येते.
…….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.