आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २९ जानेवारी २०२१
मेष – विषय ताणू नये
वृषभ – किरकोळ शारीरिक समस्या
मिथुन – जुनी येणी येतील
कर्क – जुने वाद उकरून काढू नये
सिंह – आकस्मिक फायदा
कन्या – बोलणे खरे होईल
तूळ – वास्तविकता स्वीकारा
वृश्चिक – खंबीर बना
धनु – भावनिक आकडेमोड योग्य करा
मकर – ज्येष्ठांचा सहवास महत्त्वाचा
कुंभ – महत्त्वाची कामे पार पडतील
मीन – आनंदाचे डोही आनंद तरंग.
……
शंकासमाधान
प्रश्न- वामनशास्त्री – कुंडलीतील कालसर्प दोष म्हणजे काय?
उत्तर- ज्योतिषशास्त्राप्रमाणे कुंडलीत एकूण १२ प्रकारचे कालसर्प योग असतात. कालसर्प योग कुंडलीतील राहू व केतू यांच्याशी संबंधित असून त्यांच्या कुंडलीतील स्थानांवरून बारा प्रकारचे कालसर्प योग पडतात. प्रत्येकाच्या कुंडलीत कुठला ना कुठला कालसर्पयोग असतोच. त्याचा प्रकार बघून तज्ञ आपल्याला त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करतात. कालसर्प योगाचे प्रकार असे आहेत.
- अनंत कालसर्प- यामध्ये कुंडलीतील राहू हा नंबर एक म्हणजे लग्न घरात तर त्याच्यासमोर सप्तमात केतु असतो.
- कुलिक कालसर्प- यामध्ये धनस्थान म्हणजे द्वितीय स्थानी राहू अष्टम स्थानी केतू असतो.
- वासुकि कालसर्प- यामध्ये तृतीय स्थानी राहू तर नवम ठिकाणी केतू असतो.
- शंखपाल कालसर्प – यामध्ये चतुर्थ ठिकाणी राहू तर दशम ठिकाणी केतू असतो.
- पद्म कालसर्प- यामध्ये पंचम ठिकाणी राहू एकादश ठिकाणी केतू असतो.
- महापद्म कालसर्प – यामध्ये सहाव्या ठिकाणी राहू तर द्वादश ठिकाणी केतु असतो.
- तक्षक कालसर्प – यामध्ये सातव्या घरात राहू तर लग्नघरात केतु असतो.
- कर्कोटक कालसर्प – यामध्ये आठव्या घरात राहू तर द्वितीय घरात केतु असतो.
- शंखनाद कालसर्प – यामध्ये नव्या घरात राहू तर तिसऱ्या घरात केतू असतो.
- घातक कालसर्प – दशम घरात राहू तर चतुर्थ घरात केतू असतो.
- विषाक्त कालसर्प – एकादस ठिकाणी राहू पंचम ठिकाणी केतू.
- शेषनाग कालसर्प – द्वादश ठिकाणी राहू तर सहाव्या घरात केतू असतो.
अशा पद्धतीने बारा प्रकारचे कालसर्प योग त्यांची स्थाने कुंडलीत असतात. सर्वसाधारणपणे दीर्घकाळ मानसिक त्रास, महत्त्वाची कामे दीर्घ काळ अडून राहणे, आपल्या बद्दल गैरसमज होणे, इतरांबद्दल गैरसमज होणे, सदैव आर्थिक चणचण, प्लॅनिंग फीसकटणे, नकारात्मक विचाराने घेरलेले असणे, किरकोळ कारणाने वाद घालण्याची प्रवृत्ती, मानसिक शांती नसणे, अनामिक भीती बाळगणे, महत्त्वाच्या नातेवाईकांपासून दीर्घकाळ वादांमुळे दूर राहणे, व्यसनाधीनता, पैशाची अकारण उधळपट्टी, व्यर्थ खर्च, कटू बोलणे, टोकाचा संघर्ष, कौटुंबिक भांडण अशा प्रकारच्या समस्यांचा अंदाज कालसर्प प्रकारावरून ठरवता येतो. आपल्या कुंडलीत कोणत्या प्रकारचा कालसर्प योग आहे हे तज्ञांना कुंडली दाखवून त्याबाबत मार्गदर्शन मिळवावे.
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.