आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १८ सप्टेंबर २०२०
मेष – वास्तविकता समजून घ्या
वृषभ- अवलोकन करा
मिथुन- अंदाज खरा ठरेल
कर्क- अनामिक हुरहुर
सिंह- आप्तेष्टां मध्ये रमाल
कन्या- प्रवास टाळा
तूळ- हिशोब जुळतील
वृश्चिक- कागदपत्रांचा पाठपुरावा
धनु- उठाठेव होईल
मकर- मनासारखे काम होईल
कुंभ- स्वतःला वेळ द्या
मीन- गैरसमजाने वाद
…
शंकासमाधान
प्रश्न कुलकर्णी – जपमाळ कशी धरावी?
उत्तर- कोणताही जप करताना जपमाळ ही अनामिका करंगळी व अंगठा यामध्ये धरावी. मेरूमणी ओलांडू नये.
प्रश्न पारवेकर – बंगल्याभोवती विविध झाडे कशाप्रकारे लावावीत?
उत्तर- बंगल्याभोवती झाडे लावताना उत्तर-पूर्व मध्यापासून ईशान्य तसेच उत्तर मध्यापर्यंत ५ फुटापर्यंत वाढणारी सुवासिक व सुशोभित फुलांची झाडे लावावीत. ज्यामुळे वास्तूच्या चंद्रनाडीचे शुभ प्रवाह वास्तूमध्ये पोहोचतील. याउलट बंगल्याच्या दक्षिण-मध्य पासून नैऋत्य ते पश्चिम मध्यापर्यंत अगदी वायव्य कॉर्नर पर्यंत मोठे खोड असलेली झाडे लावावीत. ज्यामुळे वास्तूच्या सूर्यनाडीचे अशुभ प्रवाह अडवले जातील.
प्रश्न वाईकर – आमच्या फार्म हाऊस मध्ये मानसिक शांती लाभत नाही.
उत्तर- फार्म हाऊसच्या दक्षिण-पश्चिम नैऋत्येकडील फ्रेंच डोअर ला गडद रंगाचे पडदे लावावेत. शक्य असल्यास उत्तर मध्य पासून पूर्व मध्यापर्यंत खिडकी अथवा दार स्वरूपात अजून दोन ओपनिंग वाढवाव्यात. फार्म हाउसच्या आत मध्ये गुरु तत्त्वाच्या रंगांच्या शेड्स द्याव्यात.
—
वास्तू टीप
वास्तूच्या प्रवेशद्वारावर जळमटे, वाळलेली तोरणे, जुनाट रांगोळ्या असल्यास त्या काढून प्रवेशद्वार स्वच्छ व आकर्षक ठेवावे.
—
रत्न टीप
माणिक गोमेद व पोवळे ही रत्ने तांबे धातू धातूमध्ये V शेप अंगठी मध्ये वापरावीत.
—
देव्हारा टीप
गोमती चक्र देव पूजेत ठेवताना त्याच्या गोल धारा नीट बघून घ्या. त्या खंडित नसाव्यात. भंगलेल्या देव मूर्ती, तुटलेल्या फ्रेम्स देवघरात ठेवू नये.
—
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा असल्याने शुभ कार्य टाळावीत.
…………………..
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.