आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १५ जानेवारी २०२१
मेष – खरे हितचिंतक ओळखा
वृषभ – अडचणींची तीव्रता कमी होईल
मिथुन – वातावरण बदलाचा त्रास
कर्क – कौटुंबिक प्रोत्साहन मिळेल
सिंह – अति धाडस टाळा
कन्या – वादग्रस्त प्रकरणात सल्ला टाळा
तूळ – अनावशक जनसंपर्क टाळा
वृश्चिक – टोकाची भूमिका नको
धनु – आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या
मकर – वरिष्ठांची नाराजी नको
कुंभ – ऐकीव बाबींवर विश्वास नको
मीन – परिश्रमाने जबाबदारी पार पाडा.
……..
शंकासमाधान
प्रश्न- गौरव – अनेक प्रकारचा तिलक म्हणजेच कपाळी टिळा लावला जातो त्याबद्दल सांगावे?
उत्तर- शैव वैष्णव आणि शाक्त या पंथांचे विविध प्रकारच्या तिलक आहेत. शैव म्हणजे म्हणजे शिव उपासक. हे उजव्या हाताची तर्जनी मध्यमा अनामिका यावर चंदन लावून ही तीन बोटे कपाळावर तीन रेघांचा स्वरूपात गंध लावतात. त्यास त्रीपुंड असे म्हणतात. तर वैष्णव म्हणजे विष्णू उपासक. हे उभ्या दोन रेघांचा स्वरूपात इंग्रजी यू आकारात गंध लावतात. यास विष्णू नाम असे म्हटले जाते. वैष्णव पंथांमध्ये लालश्री तिलक, विष्णुस्वामी तिलक, रामानंद तिलक, श्यामश्री तिलक यासह ६४ प्रकारचे विविध वैशिष्ट्यपूर्ण नावे असलेले तिलक लावण्याचा प्रघात आहे. शाक्तपंथीय म्हणजे शक्तीचे उपासक उभ्या आकाराचा लाल तिलक लावतात. या सर्व प्रकारांमध्ये गोपीचंदन, चंदन, हळद, कुंकू, भस्म याचा वापर होतो. आपापल्या परंपरा व पंथ त्यानुसार साधुसंत मंडळी व वीर पंथांचे उपासक गंध लावत असतात. योग शास्त्रीयदृष्ट्या शरीरामधल्या इडा, पिंगळा व सुषुम्ना या नाड्यांचा संगम कपाळावर जवळ भुवयांच्या मध्ये होत असतो. या ठिकाणाला आज्ञाचक्र म्हणतात. याच बिंदू ला केंद्रस्थानी मानून सर्व जण तो परंपरांचे तिलक लावण्याचा पूर्वापार प्रघात आहे.
….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे…
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.