आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १ जानेवारी २०२१
मेष- दबावाखाली निर्णय घेऊ नये
वृषभ- अनुभवाने फायदा करून घ्यावा
मिथुन – वाणीवर संयम हवा
कर्क – रचनात्मक कामावर लक्ष द्यावे
सिंह – गुण अवगुण बघून सल्ला द्यावा
कन्या – जीवनसाथीचे उत्तम सहकार्य
तूळ- मनोरंजनासाठी वेळ काढा
वृश्चिक- स्पष्ट बोलण्यापेक्षा गोड बोलून काम साधावे
धनु- आपला परका जाणून बोलावे
मकर – मानसिक प्रसन्नता राहील
कुंभ – स्ट्रेस मॅनेजमेंट करा
मीन – तर्काच्या कसोटीवर निर्णय घ्या.
………
शंकासमाधान
प्रश्न–सचिन — ब्रह्म जल पात्र म्हणजे काय ते वास्तूमध्ये कुठे ठेवावे?
उत्तर- ज्या वास्तूमध्ये समोरासमोरील तत्त्वांमध्ये दोष निर्माण झाला असेल उदाहरणार्थ जलतत्त्व, पृथ्वीतत्व, अग्नीतत्व, वायूतत्व, आकाशतत्व, ब्रह्मतत्व. अशा प्रसंगी पितळाच्या अथवा तांब्याच्या पृष्ठभाग मोठा व तळ निमुळता अशा विशेष पात्रांमध्ये दररोज पाणी भरून ते पात्र विपरीत झालेल्या एका तत्त्वाच्या कोपऱ्यात ताज्या फुलांच्या पाकळ्यांनी भरून ठेवावे. त्यामध्ये कापूर टाकावा. ब्रह्म पात्र नियमित स्वच्छ ठेवावेत. दररोज ताज्या फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात. दररोज कापूर बदलून टाकावा. यायोगे वातावरण शुद्धी होऊन मन प्रसन्न राहते.
……
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
….
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.