आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २७ नोव्हेंबर २०२०
मेष- मित्रांशी संवाद
वृषभ- संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा
मिथुन- बढतीची संधी
कर्क- दुखापत सांभाळा
सिंह- व्यवसाय उत्कर्ष
कन्या- कलाकारांसाठी मोठे यश
तूळ- शुभ पर्वाची सुरुवात
वृश्चिक- महत्त्वाचा करारमदार
धनु- रेंगाळलेली कामे मार्गी लागतील
मकर- ज्येष्ठांचा आशीर्वाद महत्त्वाचा
कुंभ- आर्थिक कोंडी
मीन- मातृ चिंता.
……
शंकासमाधान
प्रश्न- विद्याधर – कुंडलीतील कालसर्प योग म्हणजे काय?
उत्तर- कुंडलीतील महत्त्वाचे ग्रह राहू व केतू त्याच्या मध्ये येणे अशावेळी राहू पासून केतू पर्यंत कुंडलीत एक रेषा मारली तर तिचा आकार सरपा सारखा दिसतो विशिष्ट महत्त्वाच्या काळासाठी हा योग कुंडलीत येत असल्याने त्यास कालसर्प म्हणतात.. राहू काल सर्पाचे तोंड असून केतू ही शेपूट आहे. कुंडलीतील बारा घरांपैकी कुठल्याही घरात राहू असू शकतो. त्याच्या सप्तम भावात केतू असतो. बारा प्रकारचे कालसर्पयोग सांगितले आहेत त्यामध्ये कुंडलीतील प्रथम घरात राहु असता अनंत कालसर्प.. द्वितीय घरात राहु असता कुलिक कालसर्प ..तृतीय घरात राहू असता वासुकि कालसर्प.. चतुर्थ घरात शंखपाल.. पंचम घरात पद्म.. षष्ठम घरात महापद्म.. सप्तम घरात तक्षक.. अष्टम घरात करकोटक.. नवम घरात शंखनाद.. दशम घरात घातक.. एकादश घरात विषाक्त.. द्वादश घरात शेषनाग.. या प्रकारचे कालसर्प कुंडलीत असतात. यातील कोणते कालसर्प आपणास त्रासदायक ठरू शकतात हे कुंडली तज्ज्ञाच्या सल्ल्याने जाणून घ्यावे.
….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.