आजचे राशीभविष्य (शुक्रवार ११ सप्टेंबर २०२०)
मेष – दिवस आंबट-गोड राहील
वृषभ- व्यथेला दूर लोटू थोडे सुखाला आसरा देऊ
मिथुन – नभाला भेटण्याआधी धरु हात वाऱ्याचा अर्थात नवीन आव्हान स्वीकाराल
कर्क– वाद टाळा
सिंह – पुरे झाले स्वताला पाहणे नजरेत लोकांच्या अर्थात स्वतःला वेळ द्या
कन्या – व्यथेला दूर लोटू थोडे स्वतःला आरसा देऊ अर्थात स्वतःकडे लक्ष द्या
तूळ – उन्हाच्या ओंजळी लाही जरासा गारवा देऊ अर्थात दगदग करू नका
वृश्चिक – दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अर्थात भरवशाच्या ठिकाणी काम होणार नाही
धनु – सुवार्ता कळेल मकर- स्पष्ट बोलण्याचा तोटा होऊ शकतो
कुंभ- एक से भले दो अर्थात एकट्याने साहस नको
मीन– घोडदौड सुरू राहील……..
शंकासमाधान…
प्रश्न – श्री संदीप- माझ्याबद्दल फार वेळ गैरसमज होतात त्याबद्दल काय करू?
उत्तर- लग्नेश हर्शल असल्याने उत्तम श्रोता बना..
प्रश्न सायली- मला लग्नाअगोदर नोकरी लागेल काय?
उत्तर- होय आपला दशमेश उत्तम असल्याने आपणास लग्नाआधी नोकरी लागेल
प्रश्न श्री देशपांडे- उजवा शंख कसा ओळखावा?
उत्तर- शंखाचे टॉक पूर्वेकडे धरावे म्हणजे त्याचा खोलगट भाग उजव्या हाताला आल्यास उजवा शंख असतो….
आजची वास्तू टीप-
वास्तूमध्ये रंगसंगती करताना एकाच रूम मध्ये विविध रंगाचा वापर टाळावा…
आजची रत्नदीप–
रत्न सर्टिफाइड असावे तज्ञांनी सांगितलेल्या कॅरेटचे घालावे…
आजची देव्हारा टीप-
देवालयाच्या जवळच निर्माल्य साठवण करू नये.
आजचा राहू काळ-
सकाळी साडे दहा ते बारा असल्याने या वेळेत शुभ कार्य करू नये.
……………………
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.