आजचे राशीभविष्य – शनिवार – ९ जानेवारी २०२१
मेष – नोकरी-व्यवसाय परिस्थिती जैसे थे
वृषभ – विनाकारण धावपळ नको
मिथुन – अपेक्षित अडथळे
कर्क – कुटुंबातील प्रत्येकाला स्पेस द्यावी
सिंह – नेहमीच व्यायाम गरजेचा
कन्या – जुनाट आजार डोकं वर काढेल
तूळ – वरिष्ठांच्या प्रशंसेस पात्र व्हाल
वृश्चिक – जास्त सेन्सिटिव्हिटी नको
धनु – आपल्या कार्यक्षेत्रात अग्रेसर रहाल
मकर – छोट्या सहलीचे आयोजन
कुंभ – भावंडांमधील दुरावा कमी होईल
मीन – हवापालट करा.
…………
शंकासमाधान
प्रदक्षिणा टिप्स
आपण मंदिरामध्ये गेलो की प्रदक्षिणा घालतो. विविध ठिकाणी प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. सर्व ग्रह उपग्रह हे देखील एकमेकांभोवती फिरत असतात. तीदेखील प्रदक्षिणाच असते. कारखान्यातील विविध चक्र आसाभोवती गोल फिरत असतात, तीपण पण प्रदक्षिणाच असते. पृथ्वीवर उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित होणाऱ्या चुंबकीय ऊर्जा लहरी या आपल्या ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत. या ऊर्जा लहरींच्या प्रवाहास पूरक अशा पद्धतीने गोल आकार भ्रमण केल्यास त्या परिसरातील अथवा देवालय परिसरातील या शुभ उर्जा लहरी आपल्या मनोकायिक रचनेत देखील प्रवाही होतात, असा परिक्रमा करणाऱ्यांचा अनुभव असतो. म्हणून प्रदक्षिणा ही आपल्या डाव्या हाताने सुरू करून उजव्या बाजूने संपवावी. प्रदक्षिणा या विषम संख्येत घालण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ १, ३, ५, ७, ९, ११ फक्त शिवलिंगा भोवती अर्ध प्रदक्षिणा केली जाते. कारण शिवलिंगाच्या जल निष्कासन धारेला ओलांडू नये, असा प्रघात आहे. प्रदक्षिणा घालताना आपल्या गुरूंच्या मंत्राचा जप अवश्य करावा.
……
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.