आजचे राशीभविष्य – शनिवार – ६ फेब्रुवारी २०२१
मेष – अडकलेले काम मार्गी लागेल
वृषभ – दगदग टाळा
मिथुन – किरकोळ कारणामुळे चिडू नये
कर्क – व्यस्त दिवस
सिंह – प्रवास योग
कन्या – कौटुंबिक हलके-फुलके वातावरण
तूळ – सबुरीने घ्या
वृश्चिक – तब्येत नरम-गरम राहील
धनु – कुटुंबातील बाळगोपाळांवर खर्च
मकर – डोकेदुखीचा त्रास संभवतो
कुंभ – तज्ञांचा सहवास
मीन – व्यवसायिक नव्या योजना कळतील
…….
शंकासमाधान
प्रश्न- विश्वास – कुलदैवतांचे टाक याबद्दल माहिती द्यावी?
उत्तर- बऱ्याच कुटुंबांमध्ये विविध प्रकारच्या कुलदैवतांचे टाक बघायला मिळतात. काही ठिकाणी कुलदैवताचा एकच टाक असतो, तर काही ठिकाणी एक कुलदेवता दोन उपदेवता असे टाक असतात. काहीवेळा तर पाच टाक बघायला मिळतात. कुलदैवतांचे टाक तांब्याच्या पाठीचे व देव चांदीचे असे बनवावेत. सर्व कुलदेवता टाक हल्ली मिळणाऱ्या तांब्याच्या स्टॅंडवर एकाच ओळीत ठेवावे. त्यामध्ये मध्यभागी मूळ कुलदेवता व त्याच्या शेजारी उपदेवता ठेवावेत. पूजेच्या वेळी नियमित कुलदैवता टाक यांचे निरीक्षण करावे. देवांचे नाक, डोळे, चेहरा खणला असल्यास टाक नवीन बनवून घ्यावे व कुलदेवताला भेटून आणावे. टाकांची नियमित पूजा, आरती, नैवेद्य करावा. बरेचदा असे कुलदेवता टाक ज्येष्ठ घरी म्हणजे मोठ्या भावाकडे अथवा वडिलांकडे असतात. अशा वेळी नियमित तेथे जाऊन दर्शन घ्यावे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या देवघरात आपले कुलदेवता टाक असणे फार गरजेचे आहे.
……
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.