आजचे राशीभविष्य – शनिवार – ५ डिसेंबर २०२०
मेष- कटू शब्द टाळा
वृषभ- ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा
मिथुन- कलागुणांना वेळ द्या
कर्क- हिट द आयरन व्हेन हॉट
सिंह- अतिविचार टाळा
कन्या- नवीन खरेदीने बजेट कोलमडेल
तूळ- क्षणिक फायदा तोट्याचा विचार नको
वृश्चिक- नव्या संधी नव्या वाटा खुणावताहेत
धनु- सर्वच बाबतीत फायदा-तोटा विचारू नको
मकर- व्यवसायिक रिस्क घ्यावी लागेल
कुंभ- स्वप्नांचा पाठपुरावा आवश्यक
मीन- संधी सिंक्रोनाइज्ड करा.
……
शंकासमाधान
प्रश्न- प्रवीण – गंध लावताना करंगळी शेजारील बोटाने का लावतात?
उत्तर- आपल्या हाताचे प्रत्येक बोट हे विविध पंचतत्त्वांच प्रतिनिधित्व करते. त्यातील करंगळी जलतत्त्व. अनामिका पृथ्वी तत्व. मधले बोट म्हणजेच मध्यमा आकाश तत्व. तर्जनी अग्नी तत्व. अंगठा वायू तत्व असे होत. अनामिका म्हणजे शेजारील बोट हे पृथ्वी तत्वाचे प्रतिक आहे पृथ्वीतत्त्व म्हणजे स्थिरत्व स्थिर भावना आढळ विश्वास यामुळेच देवाप्रती आपली संपूर्ण श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनामिकेने गंध लावतात….
प्रश्न- चैत्राली- कोणते रत्न कोणत्या बोटात कोणत्या धातु घालतात रत्नांचे गुरु कोण?
उत्तर- पुष्कराज रत्न सोन्यामध्ये तर्जनी मध्ये घालतात.. गोमेद अथवा नीलम मध्यमा मध्ये घालतात गोमेद पंचधातु अथवा तांब्या मध्ये घालतात नीलम लोखंड अथवा चांदीमध्ये घालतात.. माणिक अनामिका मध्ये तांब्या मध्ये घालतात… पन्ना करंगळी मध्ये चांदी अथवा सोन्याचा घालतात.. मोती करंगळी मध्ये चांदीमध्ये घालतात… हिरा अनामिकेत सोन्यात घालतात.. यातील पुष्कराज चा स्वामी गुरु आहे. माणिक रत्नाचा स्वामी रवी आहे. पन्ना रत्न स्वामी बुध ग्रह आहे.. गोमेद रत्नाचे स्वामी राहू आहे. मोतीचा स्वामी चंद्र आहे… असे जरी असले तरी कोणतेही रत्न तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच विकत घ्यावे व वापरावे.
…
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.