आजचे राशीभविष्य – शनिवार – ३० जानेवारी २०२१
मेष – प्रत्येक बाबतीत रिॲक्शन देऊ नये
वृषभ – व्यवसायात नवीन प्रयोग यशस्वी होतील
मिथुन – वाद मिटवा
कर्क – नाती जपा
सिंह – सन्मान मिळेल
कन्या – अवलंबून राहु नये
तूळ – तब्येतीबाबत नरम गरम काळ
वृश्चिक – व्यवसाय वाढीची संधी
धनु – घरासाठी वस्तूंची खरेदी
मकर – विनाकारण धावपळ नको
कुंभ – सहलीचे बेत
मीन – एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
……
शंकासमाधान
प्रश्न- अश्विन – कुंडलीतील बारा घरांवरून काय काय अंदाज करता येतो?
उत्तर- कुंडलीतील बारा घरांवरून प्रश्न कर्त्याच्या विविध घटकांचा अंदाज वर्तवता येतो. उदा. कुंडलीतील पहिल्या घरावरून व्यक्तीचा स्वभाव, वागणे-बोलणे, व्यवहार, कर्तृत्व, शरीराची ठेवण, दुसऱ्या घरावरून धन, दौलत, कुटुंब, सामर्थ्य, नाक, दात, उजवा डोळा, बँकेतील जमा पुंजी, तिसऱ्या घरावरून पराक्रम, धैर्य, बुद्धिमत्ता, भावंडांची नाते, खांदे, हात, डोक्याचा उजवा भाग, चौथ्या घरावरून आई, आईचे आरोग्य, स्वतःचे घर, वाहन, स्थावर, जमीन, जुमला, पिढीजात मालमत्ता, पाचव्या ठिकाणावरुन शिक्षण, संतती, राजकारण, धनलाभ, हृदय, पोट, सहाव्या ठिकाणावरून शत्रु, रोग, आजार, नोकरी, मामा, नोकरचाकर, ओटीपोट, सातव्या घरावरून पत्नी, पार्टनर, करारमदार, कोर्ट कचेरीचा युक्तिवाद, स्वतंत्र व्यवसाय, आठव्या घरावरून अशुभ घटना, वाहन, वडिलोपार्जित मिळकत, काका, सासुरवाडी, संसर्गजन्य आजार, मोठे आतडे, नैसर्गिक आपत्ती, नवव्या घरावरुन भाग्य, तत्त्वज्ञान, परदेश गमन, तीर्थयात्रा, लोकसंपर्क श्रद्धा, दशम ठिकाणावरून कर्म, नोकरी, धंदा, वडील, सामाजिक भरभराट, धर्मिक, कृती, मालक, गुडघे, अकराव्या ठिकाणावरून इच्छा-आकांक्षा, मित्रपरिवार, सल्लागार, सहकारी, शिष्य, डोक्याची डावी बाजू, द्वादश ठिकाणावरुन खर्च, नुकसान, यश, फसवणूक, कट-कारस्थान, डावा डोळा, अशा पद्धतीने कुंडलीतील बारा घरांवरून याबाबत या बाबींचा प्राथमिक अंदाज येऊ शकतो. या सर्व बाबी व्यतिरिक्त आणखीन शेकडो प्रकारच्या बाबींचा अंदाज त्या त्या घरावरून येऊ शकतो. आपला प्रश्न ज्या घराशी निगडित आहे त्या घरासंबंधातील ग्रह व राशींचा अभ्यास करून तज्ज्ञ अंदाज व्यक्त करतात.
…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे