आजचे राशीभविष्य – शनिवार – ३ ऑक्टोबर
मेष- सावधानता आवश्यक
वृषभ- संमिश्र दिवस
मिथुन- किरकोळ विसंवाद
कर्क- वाहन सौख्य
सिंह- ज्येष्ठांकडून आर्थिक पाठबळ
कन्या- अंदाज चुकतील
तूळ- किरकोळ लाभ
वृश्चिक- स्थिर दिवस
धनु- गैरसमज टाळा
मकर- मित्रांशी संवाद
कुंभ- बचतीचा फायदा
मीन- करारमदार होतील
…..
शंकासमाधान
प्रश्न- सौ पावगी – ठराविक नक्षत्रांमध्ये पाऊस पडतो ते कसे काय?
उत्तर – फक्त नऊ नक्षत्रांचा पावसाशी संबंध असतो. त्यामध्ये मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, अष्लेशा, माघ, पूर्वाफाल्गुनी उत्तराफाल्गुनी, हिती नक्षत्र आहेत. सात जूनला रवी मृग नक्षत्रात येतो. पावसाला सुरुवात होते. अर्धा म्हणजे ओलावा. रवी आर्द्रा नक्षत्रावर आला की सर्वत्र जमिनीला भिजवणारा पाऊस होतो. आर्द्रता येते. अर्धा मुळे ओली झालेली जमीन सुपिक होते. पेरणीसाठी पुनर्वसु नक्षत्र पुष्य म्हणजे भरणे. पुनर्वसु नक्षत्रातून रवि पुष्य नक्षत्रात आला तिथे झाड आहे. वनस्पतींचे पोषण करतो. त्यानंतरच्या अष्लेशा नक्षत्र नांगरणी व पाणी जिरण्याचे उत्तम धान्य पिकून शेतकऱ्यांच्या हाती पिकण्यास मघा नक्षत्र उपयुक्त असते. आधीची पाच नक्षत्रे पाऊस न झाल्यास मघा नक्षत्राचा पाऊस आवश्यक असतो. त्यानंतर रवी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात येतो. जमिनीत मुरलेले पाणी या नक्षत्रात विहिरी खोदता येतात. रवी उत्तराफाल्गुनी नक्षत्र आल्यानंतर उर्वरित सर्व प्रकारची शेतीची कामे पूर्ण करता येतात.
प्रश्न व्यंकटेश- माणिक रत्न कोणी व केव्हा घालावे?
उत्तर- माणिक रत्न रवी म्हणजेच सूर्य प्रभावाखाली असते. नवरत्न मालिकेतील एक प्रभावी रत्न म्हणून माणिक वापरतात. ज्यांच्या कुंडलीत लग्न ठिकाणी एक म्हणजे मेष लग्न. लग्न ठिकाणी ४ अंक म्हणजे कर्क लग्न, ५ अंक म्हणजे सिंह लग्न, ८ अंक म्हणजे वृश्चिक लग्न, ९ अंक म्हणजे धनु लग्न तसेच काही विशिष्ट परिस्थितीत ३ व ५ अनुक्रमे मिथुन व कन्या लग्न असेल तर ४ कॅरेट RUBY वापरावा. अशाप्रकारे राशी जरी लग्न असतील तरी पत्रिकेतील रवि हा सहा, आठ, बाराव्या स्थानात नको. अन्यथा माणिक वापरू नये. रवीचा कुंडलीतील अंश २८ ते ३० असल्यास माणिक वापरावा. त्याचप्रमाणे रवी ग्रह प्रथम चतुर्थ सप्तम दशम भावात म्हणजेच केंद्रातील घरांमध्ये त्याचप्रमाणे प्रथम भाव पंचम भाव व नवम भावात रवी असल्यास माणिक रत्न वापरावे. ब्रह्मा अथवा बर्मा माणिक अतिशय महाग अतिशय दुर्मिळ रत्न आहे. सर्टिफिकेट शिवाय तसंच तज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय हे रत्न वापरू अथवा खरेदी करू नये. माणिक रत्न अनामिका मध्ये तांबे या धातूत वापरावे.
वास्तु टीप-
मुख्य दिशांमध्ये ऊर्जा तयार होते. दोन मुख्य दिशांमधील उपदिशा मध्ये तत्त्व तयार होते. त्यामुळे कोणत्याही वास्तूचा मुख्य प्रवेश हा तत्वा मधून घेणे टाळावे. वास्तूमध्ये पूर्व-पश्चिम उत्तर-दक्षिण असे दोन अक्ष असतात. त्यामुळे पूर्व दिशेकडील वास्तुदोष हा पश्चिम दिशेला लागू पडतो. उत्तर दिशेकडे वास्तुदोष असेल तर तो दक्षिणेला लागू पडतो.
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा असल्याने शुभ कार्य टाळावीत..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.