आजचे राशीभविष्य – शनिवार – २ जानेवारी २०२१
मेष – शब्द संयम गरजेचा
वृषभ – प्रशंसा होईल
मिथुन – आर्थिक बाबतीत ताणाताण
कर्क – पहिले समजून घ्या, मग बोला
सिंह – कौशल्याने परिस्थिती हाताळा
कन्या – कलेत रूची वाढेल
तूळ – भेटवस्तू मिळतील
वृश्चिक मोसमी आजार सांभाळा
धनु – व्यवसायिकतेवर भर द्या
मकर – धैर्याने परिस्थिती हाताळा
कुंभ – कामात पारदर्शकता ठेवा
मीन – अनावश्यक खरेदी नको.
……….
शंकासमाधान
प्रश्न-विरेंद्र – स्वतंत्र वास्तू बांधताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
उत्तर – स्वतंत्र वास्तू बांधताना वास्तूशास्त्राप्रमाणे शक्यतो पूर्व पश्चिम लांबीचा प्लॉट असू नये. असल्यास त्यात अधिक रूम दक्षिणोत्तर काढावेत. दोन पेक्षा जास्त दरवाजे एका रांगेत घेऊ नयेत. मुख्य प्रवेश हा प्रदक्षिणामार्ग घ्यावा. मुख्य द्वारात लाकडी उंबरठा बसवावा. थेट उपदिशा मध्ये मुख्य दरवाजा घेऊ नये. त्यामुळे या ठिकाणचे वास्तूतत्व विपरीत होते. वास्तूच्या दक्षिण-पश्चिम नैऋत्य दिशेचा भाग हा सहा ते आठ इंच उत्तर पूर्व ईशान्यपेक्षा वरती घ्यावा. अंडरग्राउंड पाण्याची टाकी ईशान्येला घ्यावी. ओवर हेड वॉटर टँक नैऋत्य दिशेला घ्यावी. उत्तरेला पाच पूर्वेला चार दक्षिणेला तीन पश्चिमेला २ खिडक्या ठेवाव्यात. छताचा उतार उत्तर पूर्व अथवा ईशान्य कडे करावा. स्वयंपाक घर अग्नेय दिशेला काढावे. स्वयंपाक करणाऱ्याचे तोंड पूर्व दिशेला असावे. देव्हारा ईशान्य कोपरेला ठेवावा. पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्व दिशेला असावे. बाथरूम, टॉयलेट पश्चिम वायव्य भागात काढावे.
….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.