आजचे राशीभविष्य – शनिवार – २८ नोव्हेंबर २०२०
मेष- सरकारी कामे गतिमान होतील
वृषभ- मौल्यवान वस्तू जपा
मिथुन- कौटुंबिक धुसफूस
कर्क- वास्तुविषयक व्यवहारात त्रास
सिंह- पोटाचे दुखणे सांभाळा
कन्या- अफलातून संधी
तूळ- उसनवारी सांभाळा
वृश्चिक- नोकरीत वर्चस्व
धनु- किरकोळ ओळखीत मोठे व्यवहार नको
मकर- नवी व्यवसायिक जडणघडण
कुंभ- अध्यात्मिक ओढ
मीन- परदेश प्रवास विचार.
………..
शंकासमाधान
प्रश्न- मनोज – देवाला नैवेद्य दाखवण्याची पद्धत काय आहे?
उत्तर- देवाला नैवेद्य दाखवताना तो आरतीच्या आधी दाखवावा. त्यासाठी प्रथम नैवेद्य पात्रा खाली जमिनीवर पाण्याने चौकोन करावा. त्यावर नैवेद्य पात्र ठेवावे. त्यानंतर डाव्या हाताने नाक पुडी बंद करून म्हणजेच नैवेद्याचा वास न घेता उजव्या हाताने नैवेद्या भोवती घड्याळाच्या दिशेने पाच वेळा पाणी फिरवावे. पहिल्यांदा पाणी फिरवताना ‘ओम प्राणाय स्वाहा’ म्हणावे. दुसऱ्यांदा पाणी फिरवताना ‘ओम अपानाय स्वाहा’ म्हणावे. तिसऱ्या वेळी पाणी फिरवताना ‘ओम समानाय स्वाहा’ म्हणावे. चौथ्या वेळी पाणी फिरवताना ‘ओम व्यानाय स्वाहा’ म्हणावे. पाचव्या वेळी पाणी फिरवताना ‘ओम उदानाय स्वाहा’ म्हणावे. त्यानंतर नैवेद्यातील थोडा भाग विड्याच्या पानावर देवाजवळ ठेवावा. शक्य असल्यास देवाच्या मुखाला लावून ठेवावा. अशा पद्धतीने नैवेद्य दाखवण्याचा शास्त्रार्थ म्हणजे नैवेद्याचा वास न घेता शरीरातील पंचप्राणांच्या तन्मयतेने नैवेद्य देवाला अर्पण करणे होय.
…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.