आजचे राशीभविष्य – शनिवार – २४ ऑक्टोबर २०२०
मेष- दगदग होईल
वृषभ- अधिकाराचा योग्य वापर करा
मिथुन- छोटे-छोटे मतभेद
कर्क- निर्णयावर ठाम राहा
सिंह- धावपळ टाळा
कन्या- अपेक्षांचा आलेख वाढू नये
तूळ- नो स्टॅम्पिंग
वृश्चिक- आज करे सो अब कर
धनु- आपले मत लादू नये
मकर- ITS TIME TO PROVE
कुंभ- सल्लामसलत फायद्याची
मीन- अभ्यास करून व्यक्त व्हा
………
शंकासमाधान
प्रश्न प्रचिती – उंबरठा लावण्याचे शास्त्रात काय नियम आहेत?
उत्तर- आपणास सहज उपलब्ध होणाऱ्या लाकडाचा उंबरठा लावावा. उंबरठाची लांबी, रुंदी, उंची सर्व विषम गुणोत्तरात घ्यावे. किंवा या सर्वांची बेरीज म्हणजेच घनफूट तरी विषम असावे. उंबरठ्याच्या लांबीच्या दोन्ही बाजूने फक्त पॉलिश पेपरने घासावे. CONE कटिंग करू नये. खालील आधीची ग्रॅनाईट मार्बल पट्टी काढून टाकावी. थेट पृथ्वी तत्त्वावरच लावावा. पादत्राणे घालून उंबरठा ओलांडू नये. येणाऱ्या व्यक्तींनाही तसे सांगावे. त्यावर पाय देऊन नये. शिंकणे टाळावे. त्याशेजारी केस विंचरण टाळावे. उंबरामध्ये वाद घालू नये. वास्तूतील शुभ ऊर्जा संचय होण्यासाठी तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या दिशेप्रमाणे उंबरठा जरूर लावावा.
प्रश्न नंदिता- नक्षत्रांचा उपयोग शुभाशुभ रित्या कसा बघतात?
उत्तर- कुंडली शास्त्र प्रमाणे विविध कारणांसाठी विविध प्रकारच्या नक्षत्रांचा अभ्यास केला जातो. प्रत्येक नक्षत्राचे विविध गुणधर्म असतात. त्यांची उपयोगिता निरनिराळी असते. नक्षत्र बघण्याचा उपयोग पुढील शुभकार्यासाठी शुभमुहूर्त काढताना पाहण्याचा प्रघात आहे. उपनयन, साखरपुडा, विवाह, शांती, कर्म, गृहप्रवेश, वास्तुशांती, कळस उभारणी, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, खरेदी-विक्री व्यवसाय सुरुवात, प्रवास, विशेष शुभविधि… आदी कर्म करताना नक्षत्र लाभ पाहतात.
पाहण्याचा कार्यक्रम टीप-
फक्त व्यवसाय करतो म्हणून कोणतीही शहानिशा न करता नकार देण्याचे दिवस आता संपले आहेत. आपली देखील त्यांच्या व्यवसायात कशी मदत होऊ शकेल याचा जास्त विचार करावा.
आजचा रंग
आजचा देवीचा महावस्त्र रंग मोरपंखी
आजचा राहूकाळ
सकाळी ९ ते १०.३० वाजता
—
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.