आजचे राशीभविष्य – शनिवार – २६ सप्टेंबर
मेष- हिशोब जुळतील
वृषभ- गोडधोडाचा दिवस
मिथुन- जुने विसरा
कर्क – आठवणीत रमाल
सिंह- यशप्राप्ती
कन्या- प्रभाव पडेल
तूळ- इतरांच्या विचारांचा पगडा
वृश्चिक- स्तुतीसुमने
धनु- कायदेशीर बाबीत दक्ष राहा
मकर- नेमके उद्दिष्ट वाटचाल
कुंभ- ज्ञानियांचा सहवास
मीन- अनुभवाचा फायदा होईल
….
शंकासमाधान
प्रश्न- सिद्ध विश्वास- जप माळेला १०८ मणी का असतात. जपमाळ नेच जप का करायचा?
उत्तर- धार्मिक मान्यता प्रमाणे बारा राशी गुणिले नऊ ग्रह बरोबर १०८ तर २७ नक्षत्र गुणिले प्रत्येकी चार चरण बरोबर १०८. त्याचप्रमाणे कोणत्या देवतेला मंदिरात १०८ प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात आहे. ते न जमल्यास त्या देवतेचे १०८ वेळा स्मरण केल्यास एक मानसिक प्रदर्शनास होते. जपमाळ ने जप करताना अंगठा व अनामिका यांचे जपमाळ या सोबत घर्षण होते. ज्यामुळे शरीरातील विद्युत चुंबकीय प्रवाह हातातील धमनी वाटे थेट ह्रदय चक्रापर्यंत पोहोचून संपूर्ण शरीरभर शुभ ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे एकाग्रता वाढते. जपाचे शब्द कोणताही असो यातून एकाग्रता वाढणे, मनाची चंचलता दूर होणे हे जपामुळे साध्य होते.
प्रश्न पुनम- शरीरातील पंचतत्व म्हणजे काय?
उत्तर- पिंडी ते ब्रह्मांडी या सिद्धांताप्रमाणे आपल्या शरीरात देखील जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या पिंडात आहे. संपूर्ण ब्रह्मांड हे पंचतत्वने बनलेले आहे. तद्वतच आपले शरीरही पंचतत्वाने बनले आहे. त्यातील हाडे हे पृथ्वी तत्व, शरीरातील पाणी जलतत्त्व, शरीरातील पोकळी आकाश तत्व, जठराग्नी हे अग्नी तत्व तर शरीरात फिरणारा वात हे वायू तत्व होय.
प्रश्न कसबेकर – स्वतंत्र वास्तू खरेदी करताना मुख्य दरवाजा अथवा गेट समोर कोणत्या गोष्टी नसाव्यात?
उत्तर- स्वतंत्र वास्तूच्या मुख्य दरवाजा अथवा गेट समोर मोठा खड्डा, वठलेले झाड, पाण्याचे डबके, काटेरी झुडपे, सूर्यास्त, रस्त्याचा शूल, प्रवाह पोल, उघडी गटार, कचराकुंडी, मुतारी, शौचालय या गोष्टी टाळाव्यात.
वास्तु टीप-
मुख्य दरवाजातून येणारे शुभ प्रवाह यांना अडथळा होऊ नये, म्हणून घराच्या बाहेरच डस्टबीन अथवा चप्पल स्टॅन्ड अजिबात ठेऊ नये..
रत्न टीप-
आपण वापरत असलेले रत्न अथवा पेंडंट फॅशन म्हणून दुसऱ्यांना वापरण्यास देऊ नये. त्यांनी वापरलेले आपण वापरू नये.
देव्हारा टीप-
उग्र वासाचे धूप अथवा अगरबत्ती लावू नये. शितल व सौम्य सुगंधाने शुभ ऊर्जा कार्यान्वित होते..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा असल्याने शुभ कार्य टाळावीत.
—
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.