आजचे राशीभविष्य – शनिवार – १६ जानेवारी २०२१
मेष – आर्थिक अंदाज चुकू शकतात
वृषभ – तब्येत नरम-गरम राहील
मिथुन – दूरचे प्रवास टाळा
कर्क – वादाला कारण बनवू नका
सिंह – ज्येष्ठांना सौम्य शब्दात सांगा
कन्या – अपेक्षापूर्ती
तूळ – कॅलक्युलेटेड मेहनत करा
वृश्चिक – दिशा ठरवा
धनु – सहकाऱ्यांशी सल्ला मसलत करा
मकर – सामोपचाराचा फायदा
कुंभ – सर्वांना सोबत घेऊन चला
मीन – कल्पना शक्तीचा पुरेपूर वापर करा.
…….
शंकासमाधान
प्रश्न- बनवारी लाल – जन्म नक्षत्र म्हणजे काय?
उत्तर- ज्योतिष शास्त्राप्रमाणे आपल्या जन्माच्या वेळी अवकाशात जे नक्षत्र उदयास असते ते आपले जन्म नक्षत्र होय. जन्म नक्षत्राचा एकूणच आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर प्रभाव असतो. सर्व ग्रह सूर्याभोवती ज्या लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतात. या मार्गाला क्रांतिवृत्त असे म्हणतात. या ३६० अंश लंबवर्तुळाकार क्रांती वृत्ताचे एकूण सत्तावीस समान भाग पडतात. त्यातील एक भाग १३ अंश २० कलांचा येतो. अशी एक नक्षत्र म्हणजे विशिष्ट आकाराचा एक तारकापुंज होय. एकूण २७ प्रकारची नक्षत्रे आहेत. एकूण ९ राशींपैकी प्रत्येक राशीला ३ नक्षत्र विभागलेली असतात. आपल्या जन्म नक्षत्रांचा प्रभावा प्रमाणे आपले चालणे, बोलणे, विचार करण्याची पद्धत, व्यक्त होण्याच्या पद्धती, सवयी, हावभाव, स्वभाव गुण हे दिसत असतात. या नक्षत्रांना देखील स्वतःचे स्वामी, देवता, गण, तत्व, आराध्यवृक्ष, योनी, स्वभाव, तारका, दृष्टी, सज्ञा, रंग, महिना, अवकाशातील स्थान, अवकाशात दिसण्याचे महिने, आकार या पद्धतीने स्वतःचे वैशिष्ट्य असतात.
या जन्म नक्षत्राबाबत वाचकांच्या आग्रहास्तव सविस्तर माहिती लवकरच” नक्षत्र दर्पण “या लेखमालेत देत आहे.
….
आजचा राहू काळ
सायंकाळी साडे चार ते सहा आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.