आजचे राशीभविष्य – शनिवार – १९ डिसेंबर २०२०
मेष- अपेक्षा मर्यादित हव्या
वृषभ- यशाचे भागीदार होण्याचे योग
मिथुन- फायद्याची सल्लामसलत
कर्क- नफा नुकसानीचा अंदाज घ्या
सिंह- थेट उत्तर देणे टाळा
कन्या- निर्णयात स्पष्टता हवी
तूळ- व्यापक दृष्टिकोनाची गरज
वृश्चिक- बोलण्यातून समज-गैरसमज
धनु- योग्य तिथे स्पष्ट नकार द्या
मकर- प्रियजनांची ओढ
कुंभ- सुरात सूर मिसळणे फायद्याचे
मीन- वेट अँड वॉच.
…….
शंकासमाधान
प्रश्न- भार्गवराम – वास्तूमध्ये कोणत्या प्रकारची चित्रे फ्रेम्स कोणत्या दिशेला लावावे?
उत्तर- वास्तूमध्ये उत्तर पूर्व ईशान्य या भागाच्या भिंतींवर फुले वेली हिरवाईने नटलेले सिन्स उडणारे पक्षी यासंबंधातील निसर्ग चित्रे लावावीत पूर्व आग्नेय अथवा दक्षिण आग्नेय भिंतींवर फळे भाजीपाला यांची चित्रे लावावीत मुख्य प्रवेशद्वारातून आत येतांना समोरच्या भिंतीवर स्पष्ट काटे व आकड्यांचे घड्याळ लावा. मास्टर बेडरूम मध्ये राधाकृष्ण गुलाबी रंग मुख्य असलेले फ्रीहँड फ्रेम्स. पृथ्वी तत्वाच्या दक्षिण भिंतींवर हिरव्यागार पर्वतरांगा हत्तींचा कळप असे स्थिरचित्र लावावीत. पश्चिम वायव्य उत्तर वायव्य भिंतींवर जलप्रपात उंच चिनार सारखे झाडे असे चित्र लावावीत. बेडरूम मध्ये पती-पत्नीचा हसत मुख फोटो जरूर ठेवावा. दक्षिण प्रवेश भिंती समोर पंचमुखी उभा वीर हनुमानाचा फोटो लावा. दिवंगत नातेवाईकांचे फोटो वास्तूमध्ये लावू नयेत असे शास्त्र सांगते. वास्तूमध्ये लावलेल्या सर्व फ्रेम्स वेळोवेळी स्वच्छ कराव्यात शक्य असल्यास एक दीड वर्षाने बदलून टाकाव्यात म्हणजे तोचतोपणा येणार नाही. फ्रेम्स सोबतच वास्तूतील विविध रंगसंगती झाडे हेदेखील कसे असावेत त्याचे वास्तुशास्त्रात सविस्तर विवेचन आढळते..
—
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.