आजचे राशीभविष्य – शनिवार – १२ डिसेंबर २०२०
मेष- संयमाची परीक्षा
वृषभ- कौटुंबिक लहानसहान गोष्टींची काळजी
मिथुन- व्यापार विस्तारासाठी प्रवास
कर्क- मर्यादित व्यवसायिक प्रगती
सिंह- निर्णय अंशतः योग्य होतील
कन्या- वेट अँड वॉच
तूळ – खासियत तयार करा
वृश्चिक- बोलण्यावर नियंत्रण ठेवा
धनु- आर्थिक प्रगती
मकर- मोजक्या शब्दात मत मांडा
कुंभ- छोट्या सहलीचा आनंद
मीन- घाईगडबडीत काम करू नये.
…
दिवे लागणीच्या म्हणजेच सायंकाळच्या टिप्स
दिवेलागणीच्या वेळी घर झाडू नये. सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात घरात अंधार करू नये.. या वेळामध्ये घरातील ब्रह्म तत्त्वावर अंधार असू नये. दिवेलागणीच्या वेळी घरात नंदादीप अथव अगरबत्ती लावावी. दिवेलागणीच्या वेळी शक्य असल्यास दार बंद ठेवू नये. दिवेलागणीच्या वेळी घरात अश्रू ढळू नये. दिवेलागणीच्या वेळी आंघोळ करू नये. उंबरठ्यावर पाय ठेवून गप्पा मारू नये.. दारातली रांगोळी गोपद्म विस्कटली असल्यास परत काढून घेणे. दिवेलागणीच्या वेळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावणे. दिवेलागणीच्या वेळी उसने पैसे देऊ नये अथवा घेऊ नये. यावेळी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. दिवेलागणीच्या वेळी मीठ सांडू नये. यावेळी झोपू नये. सायंकाळच्या वेळी फरशी पुसू नये. यावेळी धुण्यास काढू नये…. याउलट दिवेलागणीच्या वेळी घरात धूप लावावा.. मंत्र अथवा स्तोत्र उच्चारण करावे मंद संगीत लावावे…. पहाटे ची ब्रह्म मुहूर्ताची वेळ ही त्रिगुणातीत असते तर सायंकाळची दिवेलागणीची वेळ लक्ष्मी स्वरूप असते असा शास्त्रार्थ आहे…
—
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.