आजचे राशीभविष्य – शनिवार – १९ सप्टेंबर २०२०
मेष – अडलेले काम मार्गी लागेल
वृषभ- थोडी तू तू मै मै
मिथुन- जुने वाद सोडून द्या
कर्क- आवडीचा मेनू खाण्यास मिळेल
सिंह- आप्तेष्टांच्या भेटी
कन्या- आवरा सावर निघेल
तूळ- भूतकाळातले हिंदोळ्यावर रमाल
वृश्चिक- अनपेक्षित जबाबदारी
धनु- काल्पनिक चिंता
मकर- शब्द पुरा करण्याचा दिवस
कुंभ – पाहुणे येती घरा
मीन- आप्तेष्टां बाबत चिंता
……
शंकासमाधान
प्रश्न जुईली- कुंडलीतील सर्वात चांगला योग कोणता?
उत्तर- कुंडलीतील नवपंचम शुभ योगामुळे स्थैर्य, ऐश्वर्य, मांगल्य, मान सन्मान याची प्राप्ती होते.
प्रश्न- कालसर्प योग कसा बनतो?
उत्तर- कुंडलीतील राहू व केतू यांच्या दरम्यान बाकी सर्व ग्रह कुठल्यातरी एका बाजूला येतात त्याला कालसर्प म्हणतात. बारा प्रकारचे कालसर्पयोग असतात त्यामध्ये अनंत, वासुकी, कुलिक, शंखपाल, पद्म, महापद्म ,तक्षक, करकोटक, शंखचूड ,पातक, विषाक्त, शेषनाग असे प्रकार आहेत.
प्रश्न कृष्णकांत- माझ्या फेस रेडींग वरून मी कोणते क्षेत्र निवडावे?
उत्तर- आपल्या फेस रीडिंग नुसार आपल्या चेहऱ्याचा कॉस्मिक एरिया खूप रुंद व भव्य आहे त्यानुसार आपण संशोधन- तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्यरत रहावे.
प्रश्न कमल- माझा भाग्यांक काय?
उत्तर- आपला भाग्यांक ३ असून त्याचा स्वामी गुरु आहे. आपण गृह सजावट प्रकारातील व्यवसाय करा.
प्रश्न रवींद्र- मी भागीदारी व्यवसायात यशस्वी होईल का?
उत्तर- आपल्या कुंडलीप्रमाणे आपले जन्म नक्षत्र रेवती आहे. त्याचा स्वामी जरी व्यवसायाचा कारक बुध असला तरी आपले चरण द्वितीय आहे. त्याचा स्वामी शनी आहे. त्यामुळे आपण भागीदारी व्यवसाय करताना सर्व TERMS AND CONDITIONS नीट ठरवून घ्यावेत.
—
बॉडी लँग्वेज टीप-
बोलताना सतत चेहरा , नाक, डोळे यांना स्पर्श करणे तसेच जमिनीकडे पाहून बोलणे समोरील व्यक्तीची नजर चुकवून बोलणाऱ्या व्यक्तीवर फारसा विश्वास ठेवू नये.
अक्षर टीप-
गोल बारीक स्पष्ट अक्षर असणारी व्यक्ती अंतर्मुख असते तर मोठे स्वच्छ नसलेले फराटे दार अक्षर असणारी व्यक्ती तोंडावर बोलणारी असते…
पाहण्याचा कार्यक्रम टीप-
कुंडली जुळते की नाही, किती गुण जुळतात, राशी षडाष्टक या सर्व गोष्टींची खात्री झाल्यानंतरच प्रत्यक्ष वधू-वरांचा पाहण्याचा कार्यक्रम घ्यावा. म्हणजे नंतर कुंडली जुळत नाही या विषयावर नकार द्यावा लागून कुचंबणा होत नाही.
आवाजावरून स्वभाव टीप-
बरेचदा महत्त्वाचा विषय अनोळखी व्यक्तीशी फोनवरच बोलण्याचा प्रसंग येतो. अशावेळी समोरच्या व्यक्तीच्या उच्चारात ध, भ, र ,घ हे शब्द स्पष्ट ऐकू येत असतील तर प्राथमिक विश्वास ठेवायला हरकत नाही.
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा असल्याने शुभ कार्य टाळावीत.
…………………..
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
VERY nice. Good initiatives providing this information on mobile. Thank you. Dinesh Thombare