आजचे राशीभविष्य – (शनिवार १२ सप्टेंबर २०२०)
—
मेष- कामे मार्गी लागतील
वृषभ- पाहुण्यांची सरबराई
मिथुन- ये रे माझ्या मागल्या अर्थात केलेले काम परत करावे लागेल
कर्क- एक झकास बातमी येऊ शकते
सिंह- एकाग्रता नसेल तर कामाचा जांगडगुत्ता होईल
कन्या- एकाच कामात दिवसभर अडकून पडू शकता
तूळ- वड्याचे तेल वांग्यावर अर्थात कुणाचा राग कुणावर निघू शकतो
वृश्चिक– माहेरचा दिवस
मकर- मन वेडे शोधत राहील, बुजलेल्या पाऊलखुणा अर्थात आठवणींमध्ये रमाल
धनु – फक्त फायदा बघून निर्णय घेवू नये
कुंभ- यहा पलको पर बिठाया जाता है नजरो से गिराने के लिए अर्थात नवीन ओळखी जरा सांभाळून
मीन- बुरा जो देखन मै चला बुरा ना मिला कोई अर्थात आरोप टाळा…….
शंकासमाधान…
प्रश्न – कुमारी पल्लवी- मी नवरत्न अंगठी परिधान करू का ?
उत्तर – आपल्या कुंडलीतील शनी ची स्थिती बघता आपण फक्त सिलोन नीलम जी रम रहित सव्वादोन कॅरेट सर्टिफाइड चांदी मध्ये डाव्या हाताच्या मधल्या बोटात वापरा.
प्रश्न – सौ गुरव- मला कोणती शांती करणे आवश्यक आहे?
उत्तर– सध्याची आपली ग्रहस्थिती बघता आपण फक्त मनातला गोंधळ बंद करा त्यात शांती मिळेल.
प्रश्न – माझा नेहमी हातातोंडाशी आलेला घास निघून जातो त्यावर काय करावे?
उत्तर- आपल्या हस्तरेषा यांची स्थिती बघता एकाग्रता वाढवून प्रयत्न करा…….
आजची वास्तू टीप-
वास्तूमध्ये उग्र वासाच्या अगरबत्ती तसेच सेंट वापरणे टाळावे. घरात नको असलेल्या वस्तू वर्षानुवर्षे सांभाळून ठेवू नयेत…..
आजची रत्नटीप–
तज्ञांनी वापरण्यास सांगितलेले रत्न एक दिवसापेक्षा जास्त काढून ठेवू नये. स्वतःच्या मनाने कोणतेही रत्न वापरू नये…..
आजची रुद्राक्ष टीप-
गौरीशंकर रुद्राक्ष खरेदी करताना तो कृत्रिमरित्या चिटकवला आहे काय याची खात्री करावी…..
आजची देव्हारा टीप-
देवालयाच्या वरती कोणत्या वस्तू ठेवू नयेत देवाच्या अभिषेकानंतर पुसण्याचे वस्त्र दररोज सुगंधित पाण्याने धुवावे…..
आजचा राहू काळ
– सकाळी नऊ ते साडे दहा असल्याने या वेळात शुभकार्य करू नये
……………………
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.