आजचे राशीभविष्य – रविवार – ४ ऑक्टोबर
मेष- घाईत निर्णय नको
वृषभ- उत्तम दिवस
मिथुन- अंतर्गत वाद टाळा
कर्क- परिचितांचा सहयोग
सिंह- मोठ्या खरेदीत सावधानता
कन्या- आरोग्य सांभाळा
तूळ- वरिष्ठांची मर्जी सांभाळा
वृश्चिक- किरकोळ आजार पण
धनु- कट-कारस्थान सांभाळा
मकर- प्रवास
कुंभ- जबाबदारी वाढेल
मीन- धावपळीचा दिवस
…..
शंकासमाधान
प्रश्न मीनल- शुभयोग असणारी नक्षत्रे व दिवस कोणते?
उत्तर – महत्वपूर्ण व शुभकार्यासाठी सर्वार्थ सिद्धी योग असणे आवश्यक आहे. हा योग असलेले वार व नक्षत्र पुढीलप्रमाणे रविवारी हस्त मूळ उत्तरा शा. उत्तरा भा. उत्तरा फा. पुष्य व अश्विनी, सोमवारी श्रवण रोहिणी मृग पुष्य अनुराधा, मंगळवारी अश्विनी उ भा कृतिका आश्लेषा, बुधवारी रोहिणी अनुराधा हस्ता कृतिका अश्लेषा, गुरुवारी रेवती अनुराधा अश्विनी पुनर्वसु आणि पुष्य, शुक्रवारी रेवती अनुराधा अश्विनी पुनर्वसु श्रवण, शनिवारी रोहिणी श्रावण स्वाती ही नक्षत्रे त्या-त्या वारी असल्यास त्या दिवशी शुभ कार्यास अनुकूल असा सर्वार्थ कार्यसिद्धी योग होतो. गुरुवारी ज्या दिवशी पुष्य नक्षत्र असते, त्यास गुरुपुष्यामृत असे म्हणतात. सुवर्ण खरेदीसाठी हा योग सर्वोत्तम मानला जातो.
प्रश्न शेवडे- आराध्यवृक्ष म्हणजे काय?
उत्तर- प्रत्येक जन्मनक्षत्रसाठी एका आराध्य वृक्षाचे संगोपन संवर्धन व पूजन केल्यास शुभ ऊर्जा मिळते. त्यामध्ये नक्षत्र व त्यांचा आराध्यवृक्ष पुढीलप्रमाणे अश्विनी कुंचला, भरणी आवळा, कृतिका उंबर, रोहिणी जांभूळ, मृग खैर, आर्द्रा कृष्णागरु, पुनर्वसु वेळू, पुष्य पिंपळ, अश्लेषा नागचाफा, मगा वड, फूफा पळस, उत्तर फा. पायरी, हस्त जाई, चित्रा बेल, स्वाती अर्जुन, विशाखा नागकेशर, अनुराधा नागकेशर, ज्येष्ठा सांबर, मूळ राळ, उषा फणस, पूर्व शा. वेत, श्रवण रुई. धनिष्ठा शमी, शततारका कळंब. पूर्वा भा आंबा. उत्तरा भा. कडूनिंब. रेवती मोह अशा पद्धतीने आपापल्या नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचे पूजन करावे.
प्रश्न धैर्यधर- कुंडलीतील रवी हा निस्तेज आहे. हे कसे ओळखावे?
उत्तर- यांच्या कुंडलीतील रवी हा बलवान नसतो. त्यांच्यामध्ये पुढील लक्षणे आढळतात. आत्मविश्वासाचा अभाव, त्वरित निर्णय न घेणे, सदैव आळस, आजारपण, ऊर्जेचा अभाव, अपमान सहन करणे, पाय घासत चालणे, ठेविले अनंते असा स्वभाव असणे, अशावेळी कुंडलीतील रवी हा निस्तेज असतो.
—
वास्तू टीप
स्वतंत्र वास्तूला जर ईशान्य व आग्नेय अशा दोन्ही बाजूंनी प्रवेश देणे शक्य असल्यास ईशान्य दिशेला प्राधान्य द्यावे. स्वतंत्र वास्तूवर कौलारू कॅनॉपी करायची असेल तर थेट मध्यातून न करता ७० टक्के उतार हा उत्तर-पूर्व ईशान्येला घ्यावा. उर्वरित मागचा उतार ३० टक्के दक्षिण-पश्चिम नैऋत्येला घ्यावा.
रत्न टीप
पन्ना रत्न खरेदी करताना चौकट पन्ना घेण्यास प्राधान्य द्यावे.
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असल्याने शुभकार्य टाळावेत.
—
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.