आजचे राशीभविष्य – रविवार – २५ ऑक्टोबर २०२०
मेष- प्रकृती सांभाळा
वृषभ- आकस्मिक खरेदी
मिथुन- मित्रपरिवारात रमाल
कर्क- वाहन सौख्य
सिंह- इतरांच्या वादात पडू नये
कन्या- अंदाजापेक्षा जास्त भावनिक त्रास
तूळ- आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी
वृश्चिक- लॉंग प्लॅनिंग करा
धनु- शब्द जपून द्या
मकर- कॅलक्युलेटेड रिस्क घ्या
कुंभ- स्वतःचा पण विचार करा
मीन- मल्टिटास्किंग वर्क
…………..
शंकासमाधान
प्रश्न सुधीर- अनेकदा महत्त्वाच्या चर्चेमध्ये मला टाळले जाते. पूर्वीसारखे माझ्याशी मोकळे शेअरिंग कुणाचे होत नाही? उत्तर- आपल्या कुंडलीप्रमाणे चंद्र राहू हर्षल सोबतच विपरीत रवी यामुळे आपणाजवळ इतरांचे सिक्रेट्स ओपन न करण्याची क्षमता थोडी कमी असावी. हा अनुभव बऱ्याच जणांना आला असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती अतिशय विश्वासाने ट्रेड सिक्रेट शेअर करते ते कमकुवत चंद्र बलामुळे आपणाकडून इतरांना ओपन होत असण्याचा संभव आहे. आपण देखील याचे परीक्षण करू शकता. यामुळेच दिवसेंदिवस आपल्यापासून सर्वच बाबतीत अंतर राखले जाते. अनेक ठिकाणी आपण खूप जुने सहकारी सोबतच काम करताना बघतो त्याचे मुख्य कारण विश्वास असते. स्वतःच्या स्वभावाचा अंतर्मुख होऊन अभ्यास करा. जुना विश्वास परत मिळवा.
……..
गौरीशंकर रुद्राक्ष टीप-
गौरीशंकर दुर्मिळ रुद्राक्ष आहे. यातील दाणेदार गौरीशंकर रुद्राक्ष हा चांदी कवचामध्ये घडवून घेऊन नित्यपूजन करावे. तज्ञांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली खरेदी करावा. तीन दिवस गायीच्या तुपामध्ये परीक्षण करून मगच नित्य पूजेत घ्यावा.
आजचा रंग
आजचा देवीचा महा वस्त्राचा रंग जांभळा आहे.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
दसरा सणाच्या सर्वांना शुभेच्छा
—
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.