आजचे राशीभविष्य – रविवार – २७ सप्टेंबर
मेष- प्राप्त परिस्थितीचा फायदा घ्या
वृषभ- एकतर्फी निर्णय नको
मिथुन- वर्दळ होईल
कर्क- उष्णतेचा त्रास संभवतो
सिंह- संयमाने प्रश्न सुटेल
कन्या- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
तूळ- प्रकृतीकडे दुर्लक्ष नको
वृश्चिक- भारावून जाऊ नका
धनु- तडजोड फायद्याची
मकर- किरकोळ नेत्रविकार
कुंभ- मनसुबे पूर्णत्वास जातील
मीन- चौफेर यश
…..
शंकासमाधान
प्रश्न सौ सुवर्णा – कोणत्या राशींचे एकमेकांशी षडाष्टक असते?
उत्तर- मेष-कन्या, वृषभ-धनु, मिथुन-वृश्चिक, कर्क-कुंभ, सिंह-मकर, तूळ-मीन या राशींचे कुंडली शास्त्रानुसार षडाष्टक असते. ज्यांना कुंडली पाहूनच विवाह करायचा असल्यास षडाष्टक राशींचे गुणमिलन व ग्रह मिलन होत नसल्याने षडाष्टक असणाऱ्या राशी टाळाव्यात.
प्रश्न सौ सोळंकी – मी आतापर्यंत पाच गुरूपदेश घेतले. परंतु REALIZATION होत नाही. असे का?
उत्तर- अंतिम सत्याचा शोध हा शेवटी स्वतःमध्येच घ्यायचा आहे. REALIZE झालो आहोत, समजून घेण्याची क्षमता प्रथम स्वतःमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. REALIZATION ची प्राथमिक तयारी योगशास्त्रातील “ऋतंभराप्रज्ञा “या बुद्धी प्रकारात मोडते. विविध छोट्या-मोठ्या अपेक्षांचा कोलाहल हळूहळू कमी होत गेला की त्यातून आनंदाच्या शिव स्वरुपाच्या आत्मानुभूतीच्या आनंदी पायऱ्यांचे साक्षात्कार होत जातात. तेथून REALIZATION सुरू होते.
प्रश्न यावलकर- माझ्या आयुष्यात अनेक उत्तम संधी माझ्या स्वभावामुळे मला गमवाव्या लागल्या आहेत.
उत्तर- आपल्या कुंडलीत गुरु हा केतूचा प्रभाव खाली असल्याने “कळते पण वळत नाही” अशी स्थिती बरेचदा झाली आहे. त्यामुळे आपला स्वभावच आपला शत्रू बनतो. आपल्या नकारात्मक स्वभावात तत्काळ बदल करा. तिथूनच आपल्या प्रगतीची सुरुवात होईल.
रत्न टीप-
सिलोन नीलम रत्न महाग वाटत असल्यास FULL GOLDEN SPOTTED लाजवर्त हे छान निळसर उपरत्न घ्यावे.
वास्तू टीप-
वास्तूतील शुभ ऊर्जेचे भ्रमण हे चतुष्कोन आकृती असल्याने स्वतंत्र वास्तूला कट्स टाळावेत.
विवाह टीप –
फक्त मध्यस्थांच्या भरवशावर विवाहाचा निर्णय घेऊ नये. प्रत्यक्ष जाऊन सर्व खात्री करावी.
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असल्याने शुभ कार्य टाळावीत.
…………………..
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.