आजचे राशीभविष्य – रविवार – २० सप्टेंबर
मेष- वड्याचे तेल वांग्यावर
वृषभ- झाकली मूठ ठेवा
मिथुन- नवीन प्लॅनिंग
कर्क- अतिविचार टाळा
सिंह- अनपेक्षित फायदा
कन्या- भूतकाळात रमाल
तूळ- मन सैरभैर राहील
वृश्चिक- काखेत कळसा गावाला वळसा होईल
धनु- आज कुछ मिठा हो जाए. गोड-धोड बनेल
मकर- आम के आम गुठलियोके भी दाम.
कुंभ- आलिया भोगासी
मीन- विचारपूर्वक निर्णय घ्या
…
शंकासमाधान
प्रश्न शेंडे- माझी सर्व आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असूनही कायम तणावात असतो?
उत्तर- आपला राशीस्वामी चंद्र असून राहु सोबत आहे, तर आपला भाग्यांक आठ असून त्याचा स्वामी शनी आहे. अति विचार करू नये. तुटेपर्यंत ताणू नये….
प्रश्न जहागीरदार – बंगल्याचा प्लॉट कोणत्या दिशांच्या लांबी-रुंदीचा घ्यावा?
उत्तर- स्वतंत्र प्लॉट घेताना याची दक्षिणोत्तर लांबी जास्त असावी कारण SUNPATH पूर्व-पश्चिम असल्याने पूर्व पश्चिम लांबी जास्त असलेल्या वास्तूवर SUNSTROKE पण जास्त होतो. तसेच विद्युत चुंबकीय लहरी उत्तर-दक्षिण वाहत असल्याने त्या उत्तर-दक्षिण लांबी जास्त असलेल्या वास्तूला CORELATE करतात.
प्रश्न विशाखा- कोणते रत्न किती दिवस धारण करावे?
उत्तर – माणिक चार वर्ष, मोती तूट होईपर्यंत, पोळ्या तीन वर्ष तीन दिवस, पन्ना तीन वर्ष चार महिने, हिरा सात वर्ष, नीलम पाच वर्ष, गोमेद तीन वर्ष, लसण्या तीन वर्ष असे रत्नशास्त्र सांगितल्याप्रमाणे धारण करावे.
—
आजच्या टिप्स-
फिकट झालेला फिरोजा रत्न अजिबात वापरू नये. स्फटिक पिरॅमिड घेताना त्याचे टोक तसेच सर्व स्टेप्स या क्लिअर आहेत का बघून घ्यावे…
—
देव्हारा टिप्स –
देवघरातील कुलदैवतांचे टाक नियमित POLISH व नूतनीकरण करून घ्यावेत. कुलदैवतांचे टाका वरील डोळे, कान, नाक यांना माशी लागू देऊ नये.
—
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा असल्याने शुभ कार्य टाळावीत.
…………………..
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.