आजचे राशीभविष्य – रविवार – १८ ऑक्टोबर २०२०
मेष- प्रतिस्पर्ध्याला कमी लेखू नये
वृषभ- मोठा निर्णय नको
मिथुन- वादग्रस्त व्यवहार सांभाळा
कर्क- कष्टाचे चीज होईल
सिंह- लाभ होईल
कन्या- व्यवसाय तेजी
तूळ- अनुभवी सल्ला घ्यावा
वृश्चिक- ज्येष्ठांची चिंता
धनु- वाद टाळा
मकर- प्रमोशन
कुंभ- शुभवार्ता
मीन- मौल्यवान भेटवस्तू मिळेल
……
शंकासमाधान
प्रश्न- सौ पानसे – नवरात्र उत्सव कसा साजरा करतात?
उत्तर – नवरात्र उत्सव त्याचा अर्थ नऊ दिवस व नवरात्री. धार्मिक विधी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर महानवमी पर्यंत दिवस व रात्र घटस्थापना, नंदादीप, कुलदेवता दर्शन या धार्मिक विधी नवरात्र उत्सव म्हणतात. या दिवसांमध्ये उपवासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हा उपवास नवमीपर्यंत करावा व त्याच दिवशी उपवासाचे पालन करावे.. कुमारिका वस्त्रदान कुमारिका पूजन यास विशेष महत्त्व आहे….
प्रश्न राही- साडेतीन शक्तीपीठे कोणती?
उत्तर- साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी, तुळजापूरची श्री भवानी माता, माहूरची श्री रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तिपीठ आहेत. वणी येथील श्री सप्तशृंगी माता हे अर्ध शक्तीपीठ होत.
प्रश्न सौ पांगारकर- प्रत्येक ग्रह किती काळ एका राशीला असतो?
उत्तर- प्रत्येक ग्रहाचा राशी भोग काळ पुढील प्रमाणे रवि एक महिना राशीला येतो. त्यातील पहिले पाच दिवस फळ देतो. चंद्र सव्वा दोन दिवस राशीला येतो. त्यातील शेवटच्या तीन घटी फळ देतो. मंगळ दीड महिना राशीला येतो. पहिला आठ दिवस फळ देतो. बुध एक महिना राशीला येतो सर्वकाळ फळ देतो. गुरु तेरा महिने राशीला येतो. मध्यभागी दोन महिने फळ देतो. शुक्र एक महिना राशीला येतो मध्यभागी सात दिवस फळ देतो. शनि तीस महिने राशी ला येतो (साडेसाती) त्यातील शेवटचे सहा महिने फळ देतो. राहू व केतू 18 महीने राशीला येतात. त्यातील शेवटच्या दोन महिन्यांत फळ देतात. अशा पद्धतीने प्रत्येक ग्रहाचा राशी भोग काळ जाणावा.
नंदादीप टीप-
नंदादीपाची वात नऊ दिवस टिकेल एवढी लांब घ्यावी. दुधामध्ये भिजवून वाळवावी. तिळाच्या तेलामध्ये नंदादीप लावा. नंदादीपाची वात उत्तर अथवा पूर्व कडे करावी. नंदादीपला रांगोळी घालावी. नऊ दिवस अखंड नंदादीप राहील याची काळजी घ्यावी. नंदादीप फुंकर मारून विझवू नये..
नवरात्रीचा रंग
उद्याचा देवीच्या महा वस्त्राचा आजचा रंग केसरी तर उद्याचा रंग पांढरा होत.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा असल्याने शुभ कार्य टाळावीत.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.… इंडिया दर्पण म्हणजे माहितीचा खजिना !