आजचे राशीभविष्य – मंगळवार – २० ऑक्टोबर २०२०
मेष- आर्थिक समस्या
वृषभ- निर्णयावर ठाम राहा
मिथुन- मनासारखी घटना
कर्क- थोडे कौटुंबिक नाराजी
सिंह- परिस्थितीवर नियंत्रण
कन्या- उत्साहवर्धक दिवस
तूळ- पोटाचा त्रास
वृश्चिक- समोरच्याला न दुखावता बोलावे
धनु- प्रगतीचा वेग वाढेल
मकर- गुंतवणूक सांभाळून करा
कुंभ- जुने गैरसमज काढा
मीन- अति परिश्रम नको
…….
शंकासमाधान
प्रश्न. भार्गवराम – ज्याप्रमाणे हाताच्या रेषा पाहून भाकीत करतात. त्याप्रमाणे तळपायाच्या ठशांवरून अंदाज करता येतो का?
उत्तर- तळपायाच्या ठशांवरून देखील विविध प्रकारचे ठोकताळे करता येण्याचे शास्त्र जुनेच आहे. पायांच्या ठशांचा पुढील प्रमाणे अभ्यास करता येतो. पायाचा ठसा स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी दोन्ही पायाचे ठसे घेतल्यानंतर त्यामध्ये ठसा पूर्ण दिसतोय म्हणजे पायाच्या सर्व बोटे तळचा संपूर्ण भाग टाचा याचा भाग पूर्ण दिसतोय. मधला भाग खोलगट दिसतोय का. फक्त बोट पंजा टाच दिसतोय का. हा झाला ठसा कसा दिसतोय हा भाग. त्यासोबतच पायाचा आकार लांब आहे. निमुळता आहे. आखूड आहे. जाडसर आहे हे देखील पाहावे लागते. त्यासोबतच बोटांची रचना ही पाच प्रकारे असू शकते. त्यामध्ये प्रथम म्हणजे SELTIC- यामध्ये अंगठ्या शेजारील बोट हेच फक्त मोठे असते. दुसरा प्रकार म्हणजे GERMANIC- यामध्ये अंगठा सोडून बाकी चार बोटे एका रांगेत असतात. तिसरा प्रकार GREEK- यामध्ये आमच्या व्यतिरिक्त बाकी बोटे ही उतरती दिसतात. पुढचा प्रकार EGYPTIAN- यामध्ये दोन्ही पायाचे बोट जोडले असता धनुष्य सारखा आकार दिसतो व अंगठा व त्या शेजारील बोट व्यतिरिक्त बाकी बोटे उतरती असतात. पुढचा प्रकार ROMAN- यामध्ये पहिली तीन बोटे एका रांगेत तर पुढील दोन बोटे झुकलेली असतात. या ५ प्रकाराव्यतिरिक्त पायाची करंगळी प्रमाणापेक्षा छोटी असणे. अंगठा डाव्या किंवा उजव्या बाजूला पूर्ण TURN असणे.. सर्वच बोटे एकमेकांपासून वेगवेगळे असणे. FLAT PRINT…KARMAPRINT…VIRAT PRINT असे देखील पायाच्या ठशांचे प्रकार पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे पायावर असलेल्या खुणा, तिळाचे प्रकार पायाच्या तळव्यावर असलेल्या BIRTHSIGNS यावरून देखील प्रकारच्या अंदाज येतात. पायाचे पण मुख्यता तीन भाग असतात बोटे व चवडा हा कॉस्मिक भाग, पायाचा मधला भाग हा ग्लोबल भाग तर टाचेचा TELLURIC भाग. अशा पद्धतीने पायाची रचना ठसा त्यावरील खुणा यावरून आर्थिक स्थिती, मानसिक, शारीरिक, भावनिक, कौटुंबिक वागण्याची पद्धत, रीएक्शन्स, वास्तु सुख, परदेश गमन यासह विविध गोष्टींचे भाकीत करता येण्याची पद्धत आहे.
देवीचे कुंकुमार्चन टीप-
आज ललिता पंचमी ते महानवमी या काळात देवीचे कुंकुमार्चन करावे. यामध्ये घरामध्ये देवीची नियमित पूजा करून कुलदैवतेचा टाक सप्तधान्य मध्ये ठेवून यावर देवी सहस्त्रनाम घेत घेत एक चिमूट कुंकू प्रक्षालन करावे. सहस्रनाम झाल्यावर गणपती तसेच देवीची आरती करावी. यामध्ये उरलेले कुंकू हेच वर्षभर धार्मिक कार्यासाठी वापरावे.
आजचा रंग
देवीच्या आजचा महावस्त्राचा रंग लाल आहे.
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
—
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
—