आजचे राशीभविष्य – मंगळवार – ६ ऑक्टोबर
मेष- समाधानात दिवस जाईल
वृषभ- मनातला मेनू बनेल
मिथुन- मेहनतीला यश
कर्क- जुना अनुभव कामास येईल
सिंह- स्वतः मध्ये गर्क राहाल
कन्या- जुने येणे येईल
तूळ- परीचितांची नाराजी
वृश्चिक- अनुभवाचा वापर
धनु- अर्थकारण सुधारेल
मकर- कामात दिवस जाईल
कुंभ- धावपळ
मीन- अंदाज चुकतील
……..
शंकासमाधान
प्रश्न – स्वामिनी- राशी वरून वास्तूचा अंदाज कसा करतात?
उत्तर – राशीवरून विविध प्रकारे वास्तुचा अंदाज करता येतो. उदाहरणार्थ मेष रास ही अग्नितत्वाची राशी आहे. भरवस्तीत घर असणे घरातील मोठ्या वस्तू व त्यांच्या जागा सतत बदलणे. वृषभ रास ही पृथ्वी तत्त्वाची रास आहे. भव्य मोठी वास्तू शक्यतो वास्तू बदलत नाहीत. भरपूर हिरवळ, फुलझाडे, घरात दुर्मिळ वस्तूंचा साठा, मिथुन रास वायुतत्वाची रास आहे. द्विस्वभावी राशी सतत वास्तू बदलणे. त्यातून फायदा साधने रस्त्याकडे तोंड असलेली वस्तू आवडते. कर्क रास जलतत्त्वाची रास सहज सापडेल असे घर कायम भटकंती सहसा घरी सापडत नाहीत. जलाशयाच्या आसपास घर घेणे आवडते. सिंह रास अग्नीतत्वाची रास स्थिर वास्तू आवडते. संपूर्ण सुरक्षित घर असते. संरक्षक भिंत हमखास कुत्रा पाळतात. कन्या रास पृथ्वी तत्त्वाची रास. द्विस्वभाव राशि. एकतर तळमजला नाहीतर थेट टॉप अशी वास्तू असते. घरातील स्त्रियांच्या आवडीचे घर घेतले जाते. किरकोळ कारणाने देखील वास्तु बदलतात. तुळ रास वायुतत्वाची रास. व्यापारी पेठेत वास्तु घराजवळच. सर्व सामान मिळावे असा उद्देश. भरपूर पाहुणे घरी यावे असे वाटते. पण स्वतः मात्र घरी थांबत नाहीत. वृश्चिक रास जलतत्वाची रास. भरवस्तीत गरज असते. घर सहज सापडते. तळमजला आवडतो. इतरांना यांच्याशी स्वभाव जुळवून घ्यावा लागतो. धनु रास अग्नीतत्वाची रास. अनेक मजली घर आवडते. जवळपास हमखास एखादी ग्रंथालय संस्कार केंद्र. मकर रास पृथ्वी तत्त्वाची रास. रस्त्याच्या कोपऱ्यावर घर असते. कोणत्याच गोष्टीसाठी लांब जावे लागणार नाही. किती काळजी घेतात. वरचेवर घर बदलण्याची सवय. आधीचे घर विकताना मात्र नुकसान होते. कुंभ रास वायुतत्वाची रास. शेवटच्या मजल्यावर राहतात. हवेशीर वास्तु आवडते. भरपूर खिडक्या दारे करून घेतात. पाहुण्यांचे सदैव येणे-जाणे सुरू असते. मीन रास जलतत्वाची रास. छोटे व टुमदार घर आवडते. सर्व वस्तू जिथल्या तिथे असतात. अशा पद्धतीने विविध राशी व त्यांच्या वास्तूबद्दल अंदाज करता येतो.
प्रश्न विशाखा- कुंडलीतील गजकेसरी योग किंवा विश्व कीर्ती योग म्हणजे काय?
उत्तर- कुंडलीतील ग्रह राशी त्यांचे अंश वरून विविध प्रकारच्या योगांचा अंदाज करता येतो. हे दोन्ही योग कुंडलीतील अनुक्रमे चंद्र व शुक्र यांच्या सुयोग्य स्थिती वरून बनतात. गजकेसरी योगात कुंडलीतील चंद्रापासून केंद्रात गुरु तसेच गुरूपासून केंद्रात चंद्र 1’4 ‘7’ 10 स्थानात असेल तर गजकेसरी योग बनतो. गुरु व चंद्राची स्थिती जितकी बलवान तितका संबंधित व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो. मृत्युनंतर देखील त्याची कीर्ती अबाधित राहते. विश्व कीर्ती योगामध्ये कुंडलीतील शुक्र हा केंद्र त्रिकोण 1.4. 7. 10. 5.9 स्थानात असेल आणि तो स्वगृही असेल किंवा उच्च असेल तर विश्व कीर्ती योग होतो. या योगात देखील कुंडली धारकाची संपूर्ण विश्वात कीर्ती पसरते.
प्रश्न सांगलीकर- स्वतंत्र बंगल्यासाठी प्लॉट घेताना वास्तुशास्त्राप्रमाणे मुख्यतः कोणत्या बाबी बघाव्यात?
उत्तर- स्वतंत्र वास्तूसाठी मुख्य प्रवेश हा उत्तर मध्य ते पूर्व मध्य या दिशांमधून असावा. प्लॉटची दक्षिण-पश्चिम नैऋत्य दिशा उंच असावी. त्यामानाने उत्तर पूर्व ईशान्य खाली असावी. प्लॉटच्या सभोवताली उत्तर अथवा पूर्व किंवा दोन्ही दिशांकडून रस्ते असावेत. परंतु पश्चिमेकडून अथवा दिशेकडून असणारे रस्ते टाळावेत.
वास्तु टीप-
स्वतंत्र वास्तू मध्ये दक्षिण-पश्चिम नैऋत्येला असलेले उतार, खड्डा, पाणथळ जागा टाळाव्यात.
रत्नटीप-
मोती खरेदी करताना तो ओबडधोबड आकाराचा, थोडीशी पिवळसर झाक असलेला घ्यावा.
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असल्याने शुभ कार्य टाळावीत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.