आजचे राशीभविष्य – मंगळवार – २९ सप्टेंबर
—
मेष- शब्दांवर नियंत्रण ठेवा
वृषभ- पाहुण्यांचे स्वागत
मिथुन- काटकसर फायद्याची
कर्क- व्यवहारात सावधानता
सिंह- संशोधनात वेळ जाईल
कन्या- महत्त्वाचे काम मार्गी लागेल
तूळ- वाहन जपून चालवा
वृश्चिक- द्विधा मनस्थिती
धनु- एकला चलो रे
मकर- मित्र परिवाराची भेट
कुंभ- नवी खरेदी
मीन- अभ्यासात गर्क राहाल
……..
शंकासमाधान
प्रश्न – मोहन- कुंडलीत मांडलेले अंश काय असतात?
उत्तर- कुंडलीत ग्रह व त्यांच्यासोबत अंशांचे आकडे मांडलेले असतात. हे अंश म्हणजे त्या ग्रहाची कुंडलीतील अवस्था. आपापल्या अवस्थेप्रमाणे संबंधित ग्रह शुभाशुभ ठरतो. उदा. शून्य ते सहा अंश सोबत मांडलेला ग्रह हा बाल्यावस्थेत असतो. २५ टक्केच फळ देतो, तर ६ ते १२ अंश असलेला ग्रह कुमारावस्थेत असतो. ५० टक्के फळ देतो. १२ ते १८ अंश युवावस्थेत शंभर टक्के फळ देतो. १८ ते २४ अंश वृद्धावस्था २० टक्के फळ आणि २४ ते ३० अंश मृत अवस्था पाच टक्के फळ देतो. कुंडलीतील घर तीस अंशापर्यंत मोजले जाते.
प्रश्न – बावनकर- आमच्या स्वतंत्र नूतन वास्तूचे काम सुरु करीत आहोत. शौचालय कोणत्या दिशेला घेऊ नये?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे ब्रह्म तत्वात उभे राहिल्यानंतर DEEP NORTH WEST पासून संपूर्ण NORTH तसेच संपूर्ण EAST, त्याचप्रमाणे SOUTH CENTRE च्या भागापर्यंत कुठेही शौचालय घेऊ नये.
प्रश्न – चौबल- प्रत्येकाच्या राशीला साडेसाती केव्हा सुरू होते. ती केव्हा त्रासदायक असते?
उत्तर- आपल्या राशी पेक्षा आधीच्या राशीला शनी येतो. तेव्हा आपल्या राशीला साडेसातीचे पहिले अडीच वर्षाची सुरुवात होते. हा साडेसातीचा सौम्य काळ होय. त्यानंतरची अडीच वर्षे शनि आपल्या राशीला येतो. त्याला साडेसातीचा मध्यान काळ म्हणतात. या काळातच बरेच जणांना खरी साडेसाती जाणवते. आपली रास ओलांडून पाच वर्षानंतर शनी पुढील राशीत जातो. तो साडेसातीचा उतार असतो. आपल्या बोलण्यात, वागण्यात, व्यवहारात वागताना योग्य ते सकारात्मक बदल केल्यास साडेसातीचा मध्यान काळ देखील सहज पार होतो.
लग्न ठरवण्यासाठी टीप-
वधू-वरांच्या बायोडाटा मध्ये त्यांच्या नोकरीच्या ठिकाणचा पत्ता स्पष्टपणे लिहिणे प्रथमता टाळावे. अनुरुप स्थळांशी तीन-चार वेळा फोनवर संपर्क झाल्यावर विश्वास वाटल्यासच नोकरीच्या ठिकाणाचा स्पष्ट पत्ता सांगावा.
रत्न टीप-
ग्रह स्वामी मित्र नसलेले रत्न एकाच वेळी अथवा एकाच अंगठीत घालू नये.
तांबे धातु टीप-
तांब्याचे कडे हातात व पायात घालताना आपल्या कुंडलीतील मंगळाची स्थिती तसेच कुंडलीतील अग्नेय दिशांच्या ग्रहांची अंशात्मक स्थिती तज्ज्ञांकडून पाहून मगच तांब्याचे कडे घालावे.
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असल्याने शुभ कार्य टाळावीत.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.