आजचे राशीभविष्य – मंगळवार – २२ सप्टेंबर
मेष- सन्मान मिळेल
वृषभ- तब्येत सांभाळा
मिथुन- सुवार्ता
कर्क- उलाढाल वाढेल
सिंह- ये रे माझ्या मागल्या
कन्या- वास्तविकता स्वीकारा
तूळ- ताळमेळ बसेल
वृश्चिक- संभाळून सल्ला द्या
धनु- नवी खरेदी
मकर- आज जरा जपून
कुंभ- वाद टाळा
मीन- खर्च सांभाळा
…….
शंकासमाधान
प्रश्न हरप्रीत- माझ्या कुंडली वरून मी कोणते रत्न वापरू?
उत्तर- आपल्या कुंडलीनुसार आपण जांबिया पन्ना चार कॅरेट चांदी मध्ये उजव्या हाताच्या करंगळीत वापरावा.
प्रश्न सुहास – लग्न ठरवत आहे. कशाला महत्त्व द्यावे?
उत्तर- विश्वास, माणुसकी, प्रामाणिकपणा हाच दोन कुटुंबातील भविष्यातील नात्यांचा पाया आहे.
प्रश्न माया- मी खूप लवकर गैरसमज करून घेते. त्यामुळे अनेक नातेवाईक तुटले आहेत.
उत्तर- आपल्या कुंडलीत चंद्र राहु सोबत असल्याने गैरसमज करुन घेण्याचा स्वभाव सोडावा. प्रत्येक घटनेला तीन बाजू असतात. एक आपली, एक समोरच्याची आणि एक खरी. गैरसमजाने फक्त स्वतःचेच नुकसान होते.
….
आजच्या टीप-
बंगल्याचे मुख्य गेट ते मुख्य प्रवेशद्वार हा प्रदक्षिणामार्ग असावा.
रत्नटीप
पुष्कराज रत्न खरेदी करताना सिलोन बँकोक तोपाज या प्रकारात मिळते. आपले बजेट पाहून तज्ञांच्या सल्ल्याने प्रकार घ्यावा.
गृहटीप
सन स्टोन खरेदी करताना त्यातील तपकिरी व काळा अशा रंगात अधिक सोनेरी चमक असलेला घ्यावा..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असल्याने शुभ कार्य टाळावीत..
—
…………………..
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.