प्रश्न – शिरीष – वास्तुशास्त्राप्रमाणे स्वतंत्र वास्तूमध्ये शौचालय कुठे असावे?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे स्वतंत्र वास्तूमध्ये शौचालय पश्चिम पश्चिम वायव्य दिशेला घ्यावे. यामध्ये मी दोनदा पश्चिम म्हटले आहे. त्याचे कारण पश्चिम दिशेच्या भिंती वर दोन समान भागाची खूण करावी पूर्वेकडे पाठ करून उभे राहिल्यावर पश्चिम भिंतीचा उजव्या हाताकडील अर्धा भाग त्याचे पण तीन भाग करावे. त्यातील सर्वात शेवटच्या उजव्या भागावर शौचालय घ्यावे. कोणत्याही कारणाने ते शक्य नसल्यास त्या तीन भागापैकी कुठेही घ्यावे. तेथे शक्य नसल्यास ब्रम्हा तत्त्वापासून दक्षिण भिंतीचा मध्यभाग त्याच्या तीस डिग्रीवर शौचालय घ्यावे. पूर्वेकडील भाग, उत्तरेकडील भाग, दक्षिण दक्षिण नैऋत्य कोपरा अथवा पश्चिम पश्चिम नैऋत्य या भागांमध्ये शौचालय घेऊ नये. वरील सर्व जागा वास्तु तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित कराव्या.
……..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!