आजचे राशीभविष्य – मंगळवार – २ फेब्रुवारी २०२१
मेष – सबुरीने घ्या
वृषभ – पाहुणे येतील
मिथुन – महत्त्वाच्या वस्तू सांभाळा
कर्क – आपली चूक दुसर्याच्या माथी मारू नये
सिंह – गोडधोड खायला मिळेल
कन्या – गुंतवणुकीचा निर्णय बाबत मतभेद
तूळ – स्वतःकडे लक्ष द्या
वृश्चिक – एकदाच पण व्यवस्थित प्लॅनिंग करा
धनु – निसर्ग सानिध्य लाभेल
मकर – जाणकार सल्लागारांचे ऐका
कुंभ – व्यवसायिक महत्वाचा दिवस
मीन – फापटपसारा बोलणे टाळा.
……….
शंकासमाधान
प्रश्न-प्रफुल्ल – बोलण्याची पद्धत किंवा बॉडी लँग्वेज वरून एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ओळखता येते का?
उत्तर- बॉडी लँग्वेज किंवा बोलण्याच्या लकबी वरून व्यक्तिमत्व ओळखण्याच्या माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या काही टिप्स आहेत. त्यात बर्यापैकी तथ्य आढळते असा वाचकांचा देखील अनुभव आहे. उदाहरणार्थ थेट विषयावर येणाऱ्या व्यक्ती या प्रामाणिक असतात. तर समोरच्याचा मूड पाहून विषय काढणारा व्यक्तीचा उद्देश तपासून बघावा. दारातच महत्त्वाचा विषय बोलणारी व्यक्ती थोडी भांडखोर असू शकते, परंतु घरात येऊन सोफासेट अथवा दिवाणाच्या मध्यभागी बसून चर्चा करणारी व्यक्ती मध्यममार्गी असते. मोजके व योग्य तिथे हातवारे करून बोलणारी व्यक्ती त्या विषयात पारंगत असते, तर मागे हात बांधून बोलणारी व्यक्ती त्या विषयात नवीन असू शकते. स्वतःची चप्पल अथवा बूट एका कोपऱ्यात व्यवस्थित काढणारा व्यक्ती त्याच्या क्षेत्रात ज्ञानी तसेच चांगला मार्गदर्शक असतो. याउलट कशीही चप्पल काढणारा व्यक्ती धांदरट असू शकतो. प्रमाणापेक्षा मोठ्याने हसून स्वागत करणारा व्यक्ती प्रथम स्वतःचा फायदा बघतो, तर सर्वसामान्य स्मित करणारी व्यक्ती दोघांचेही हित पाहते. बसल्यावर सतत पाय हलवणारी व्यक्ती कोणत्यही विषयाचे गरजेपुरते ज्ञान घेते तर दोन पायावर समान भार देऊन उभी राहणारी व्यक्ती वास्तववादी असते. प्रत्येकाच्या चालण्या-बोलण्यातील तसेच हावभावावरून अशा शेकडो टिप्स आहेत. त्यांचा अभ्यास करून आपण समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल प्राथमिक अंदाज करू शकतो. प्रत्येकाच्या कुंडलीतील लग्न स्थानातील ग्रह तसेच राशीवरून देखील त्या व्यक्तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येतो. त्यावरुन त्या व्यक्तीशी व्यवहार करताना योग्य ती सावधानता बाळगता येते. याचा उपयोग दैनंदिन व्यवहारात माझ्या मार्गदर्शनाने असंख्य वाचक घेत आहेत असा माझा अनुभव आहे.
…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे…
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.