आजचे राशीभविष्य – मंगळवार – २६ जानेवारी २०२१
मेष – कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी
वृषभ – भागीदारीत यश
मिथुन – प्रवास योग
कर्क – शाब्दिक कटुता टाळा
सिंह – योग्य श्रेय मिळेल
कन्या – प्रयत्न सोडू नयेत
तूळ – वरिष्ठांच्या तब्येतीची काळजी
वृश्चिक – कंफर्ट झोन मधून बाहेर या
धनु – जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल
मकर – सुवार्ता मिळेल
कुंभ – नवीन काही करून पाहण्याची संधी
मीन – सुसंवादाचा फायदा होईल
—
शंकासमाधान
प्रश्न- शशिकांत – पुष्कराज व माणिक रत्नाबाबत काय माहिती आहे?
उत्तर- पुष्कराज हे गुरुचे रत्न आहे तर माणिक हे रवीचे. रत्न पुष्कराज सोन्यामध्ये उजव्या हाताच्या तर्जनी मध्ये वापरला जातो. तर माणिक हा उजव्या हाताच्या अनामिका मध्ये तांब्याच्या धातूत वापरला जातो. यांचे पेंडंट देखील वापरले जाते. मुळातच पुष्कराज मधील सिलोन किंवा बँकोक प्रकार तर माणिक मधील न्यू बर्मा पोटा या प्रकारातील रत्ने ही बर्यापैकी महाग मिळतात. त्यामुळे यांची उपरत्ने वापरण्याचा प्रघात देखील पाहायला मिळतो. पुष्कराजच्या उपरत्न मध्ये पित स्फटिक, नरम पुष्कराज, धूम्र स्फटिक, टाटरी पुष्कराज, तोपाज, पिवळा हकिक ही त्यामानाने स्वस्त उपरत्न असतात. चांदीत वापरली तरी चालतात. तर माणिक रत्नामध्ये लाल हकिक, ताम्रमणी, मैसुरी माणिक, सूर्यकांत मणि विक्रांत मणी सन स्टोन उपरत्ने आहेत. कोणतेही रत्न अथवा उपरत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घालू नये.
—
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.