आजचे राशीभविष्य – मंगळवार – १९ जानेवारी २०२१
मेष – किरकोळ मतभेद टाळा
वृषभ – कौटुंबिक दुरावा कमी होईल
मिथुन – उत्साही वातावरण राहील
कर्क – अधिक स्वावलंबी बना
सिंह – गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्या
कन्या – जोडीदाराशी मतभेद टाळा
तूळ – ठरवलेल्या धोरणावर कार्यरत बना
वृश्चिक – तब्येतीचे नियमीत चेकअप करा
धनु – थोड्याच श्रमात पुरेपूर फायदा
मकर – प्रशंसेस पात्र व्हाल
कुंभ – ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील
मीन – कर्तुत्वाने जिंकाल ते बोलण्यात हरू नका.
…….
शंकासमाधान
प्रश्न- शैलेंद्र – भजन कीर्तन अथवा आरतीमध्ये टाळी वाजवण्याचे प्रयोजन काय?
उत्तर- पूर्वापार भजन-कीर्तन अथवा आरतीमध्ये तालबद्ध पद्धतीने मृदंग अथवा तबल्याच्या ठेक्यावर टाळी वाजवण्याची प्रथा आहे. आपण जर नीट लक्ष दिले तर ही टाळी आरतीमध्ये अथवा भजन कीर्तन गाण्यांमध्ये समेवर वर वाजवली जाते. म्हणजे जो ताल त्यावेळी वाजवला जातो त्या तालाचे विशिष्ट बोल असतात. त्यातील डग्गा वरील थापे वर पण टाळी वाजवतो. ही लय संपूर्ण शरीरभर पसरत असते. टाळी वाजवण्याचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच परंतु शारीरिक व मानसिक देखील महत्त्व आहे. ॲक्युप्रेशर थेरपी अथवा सुजोक थेरपी मध्ये याबाबत सविस्तर माहिती मिळते. शरीराच्या विविध महत्त्वाच्या अवयवांचे प्रेशर पॉईंट्स हे डाव्या व उजव्या हातांच्या तळव्याच्या उंचवट्यावर असतात. लय बद्ध टाळी वाजवल्याने हे प्रेशर पॉईंट ॲक्टिव होतात. रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होऊन शरीरांतर्गत ऊर्जा वाढते. मानसिक एकाग्रता वाढते. शरीरात चैतन्य निर्माण होते. त्यामुळे एरवीसुद्धा सकाळी उठल्यावर सायंकाळी तालबद्ध पद्धतीने नियम करून टाळी वाजवल्यास त्याचा सर्वस्पर्शी आपणास फायदा होईल. टाळी वाजवणे हे सर्वात सोपे योगासन आहे.
…..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.