आजचे राशीभविष्य – मंगळवार – १२ जानेवारी २०२१
मेष – संयम ठेवा
वृषभ – फायद्याचा सौदा होईल
मिथुन – भावनिक गणित बसवा
कर्क – आ बैल मुझे मार अशी स्थिती टाळा
सिंह – विनासायास आर्थिक काम होईल
कन्या – शब्द जपून वापरा
तूळ – बंद हो मुठी तो लाख की
वृश्चिक – भावनिक पेक्षा व्यवहारिक बना
धनु – आजची खेळी आपली नाही
मकर – गोंधळाच्या मनस्थितीत निर्णय नको
कुंभ – धार्मिक कार्य पार पडेल
मीन – काखेत कळसा गावाला वळसा.
………
शंकासमाधान
प्रश्न- दत्तात्रय वास्तुशास्त्राप्रमाणे झोपताना डोके कोणत्या दिशेला करावे?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे झोपताना डोकं दक्षिण दिशेला करावे, अशा पद्धतीने शक्य नसल्यास क्वचित प्रसंगी पूर्व दिशेला करावे. परंतु चुकूनही उत्तर अथवा पश्चिम दिशेला डोकं करून झोपू नये. पृथ्वीवर वाहणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. ज्यावेळी आपण दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपतो, त्यावेळी या उर्जा लहरी सर्व शारीरिक क्रियांना पूरक- सपोर्टिंग अशी भूमिका पार पडतात. ज्यामुळे आपल्या सर्व शारीरिक क्रिया झोपेतही सामान्य पद्धतीने सुरू राहतात. वास्तुशास्त्राप्रमाणे नैऋत्य दिशेचे मास्टर बेडरूम, वायव्य दिशेचे गेस्ट बेडरूम, आग्नेय भागातील तरुण मुलांचे बेडरुम अशा कुठल्याही बेडरूम मध्ये बेड मात्र उत्तर-दक्षिण ठेवावा. त्यावर झोपताना डोके दक्षिण दिशेकडे करावे. अपवादात्मक स्थितीमध्ये पूर्व दिशेकडे डोके करावे.
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.