आजचे राशीभविष्य – मंगळवार – ५ जानेवारी २०२१
मेष – कामे वेळेत पार पडतील
वृषभ – परिचितांमधे व्यवहार नको
मिथुन – शाबासकी की मिळेल
कर्क – शुल्लक कारणावरून संधी जाऊ नये
सिंह – कृतीशील रहा
कन्या – वरिष्ठांच्या सहकार्याने निर्णय घ्या
तूळ – भावनेच्या आहारी जाऊ नये
वृश्चिक – नवीन प्रस्तावावर काम सुरू करा
धनु – कार्यक्षेत्रात बदल
मकर – तडजोडीत फायदा
कुंभ – मानसिक अस्वस्थता
मीन – भागीदारीत यश.
………
शंकासमाधान
प्रश्न – प्रतीक – शंखध्वनी करताना म्हणजेच शंख वाजवतांना काय नियम आहेत?
उत्तर – शंख वाजवताना त्यामध्ये प्रयत्नपूर्वक जोर लावून हवा फुंकू नये. तर केवळ गळ्यातील व गालातील स्नायू व हवेच्या ताकदीने शंख वाजवावा. शंख वाजवतांना ओठांशी नव्वद अंशाचा कोन करावा. म्हणजे फुंकलेल्या हवेचा फोर्स पूर्ण क्षमतेने शंखाच्या गोलाईत फिरेल व शंख पूर्ण क्षमतेने वाजेल. शंख पहाटे ब्राह्ममुहूर्तावर, सायंकाळी सूर्यास्ताच्या दरम्यान वाजवावा. एकावेळी तीनदा शंखध्वनी करावा. वाजवणाऱ्याचे तोंड उत्तर पूर्व अथवा ईशान्येकडे असावे. अनुभवी व्यक्तींसोबत सराव केल्यास दोन ते तीन दिवसात सफाईदारपणे शंख वाजवता येतो. नियमित पूर्ण क्षमतेने शंखध्वनी केल्यास आत्मविश्वास वाढणे, गळा व गाल यांचे स्नायू व संपूर्ण चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुरळीत राहते, एकाग्रता वाढण्यास मदत होते.
—
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.