आजचे राशीभविष्य – मंगळवार – १५ डिसेंबर २०२०
मेष- नातलगांना भेटण्याचा योग
वृषभ- योजना फलद्रूप होतील
मिथुन- गैरसमजातून वाद टाळा
कर्क- अहंकार सांभाळा
सिंह- मोठी व्यवसायिक देवघेव
कन्या- अनिद्रा अपचन समस्या दुर्लक्ष नको
तूळ- कार्य कौशल्याचे कौतुक होईल
वृश्चिक- बोलण्यात संयम ठेवावा
धनु- रचनात्मक कार्य पूर्णत्वास जाईल
मकर- वातावरणामुळे हाडांचा त्रास संभवतो
कुंभ- नोकरी व्यवसायातील स्थिती नियंत्रणात राहील
मीन- बुद्धिचातुर्य कस लागेल.
……..
शंकासमाधान
औक्षण करतानाच्या टिप्स
विविध प्रकारच्या शुभप्रसंगी औक्षण करण्याचा योग येतो. अशावेळी औक्षण करताना तांब्याचे तबक व शक्यतो तांब्याचे निरंजन घ्यावे. तबकामध्ये कापूस, सुवर्ण अंगठी, हळकुंड, सुपारी, हळद, कुंकू, अक्षदा, भिजलेली वात व निरंजन या वस्तू असाव्यात. औक्षण करताना सर्वप्रथम ज्याला औक्षण करायचे आहे त्याच्यासमोर रांगोळी काढावी. रांगोळीवर हळद-कुंकू वहावे. त्यानंतर निरंजनामध्ये वात प्रज्वलित करावी. तबकामधील कुंकू थोडे ओले करून ते त्या व्यक्तीच्या कपाळावर लावावे. ओल्या कुंकूवर अक्षदा लावाव्यात. त्यानंतर पाच वेळा त्या व्यक्तीला ओवाळावे (घड्याळाच्या काट्याच्या दिशेने). त्यानंतर तबकातील कापूस उजव्या हातात घेऊन तो त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती प्रथम उजव्या बाजूने नंतर डाव्या बाजूने अर्धा चक्राकार फिरून परत तबकामध्ये ठेवावा. याच पद्धतीने सुपारी, हळकुंड, सोन्याची अंगठी अर्ध चक्राकार फिरून परत तबकामध्ये ठेवावी. त्या व्यक्तीच्या डोक्यावर अक्षता वहाव्यात. परत एकदा ओवाळून तबक देवाजवळ ठेवावे. असे ओवाळलेले तबक थेट जमिनीवर ठेवू नये. शक्य असल्यास पाच जणींनी ओवाळावे. घराबाहेरुन आलेल्या व्यक्तीस ओवाळायचे असल्यास वरील प्रकारे ओवाळणे झाल्यावर त्या व्यक्तीच्या पायावर थोडे पाणी टाकावे. घरातील भाकर तुकडा ओवाळावा. मग आत येऊ द्यावे. जर घरातच असलेल्या व्यक्तीला औक्षण करायचे असल्यास खाली जमिनीवर बसून त्याचा चेहरा उत्तर-पूर्वेकडे करण्यास सांगावे. मगच औक्षण करावे. दक्षिण अथवा पश्चिम दिशेकडे ज्याला ओवाळायचे आहे त्याचे तोंड असू नये. डोक्यावर टोपी अथवा वस्त्र द्यावे. ज्याला ओवाळले जाईल त्याने काहीना काही ओवाळणी अवश्य टाकावी. औक्षण करणे म्हणजे दीर्घायुष्याची कामना करणे. निरंजना तिलाअग्नी हे ऊर्जेचे प्रतीक आहे. कापूस ते वस्त्र पर्यावरणाचे प्रतीक आहे. सोन्याची अंगठी हे ऐश्वर्याचे प्रतिक आहे हळकुंड हे आरोग्याचे प्रतिक आहे. सुपारी हे मांगल्याचे प्रतीक आहे. औक्षण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला गोडघास जरूर द्यावा…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.