आजचे राशीभविष्य – मंगळवार – १ डिसेंबर २०२०
मेष- किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष नको
वृषभ- नव्या आर्थिक उलाढाली
मिथुन- वाद-विवाद टाळा
कर्क- व्यवसायात साहस टाळा
सिंह- तडजोड स्वीकारा
कन्या- मनस्थिती दोलायमान राहील
तूळ- ताकही फुंकून प्यावे
वृश्चिक- मानापमान नाट्य सांभाळा
धनु- छंद जोपासा
मकर- वास्तूतील धार्मिक कार्याचे प्लॅनिंग
कुंभ- पित्ताचा त्रास सांभाळा
मीन- मित्र परिवाराकडून जास्त अपेक्षा नको.
……..
शंकासमाधान
प्रश्न- राकेश – स्वयंपाक घर याबाबत वास्तुशास्त्राचे काय नियम आहेत?
उत्तर- स्वतंत्र वास्तूत स्वयंपाक घर हे अग्नेय दिशेस असावे. म्हणजेच पूर्व व दक्षिण दिशेच्या कोपर्यात असावे. स्वयंपाकाची गॅस शेगडी पूर्व दिशेकडील ओट्यावर असावी. म्हणजे स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे येईल. L आकाराचा किचन ओटा करायचा असल्यास पूर्व व दक्षिण दिशांना करावा. उत्तर व पश्चिम दिशा मोकळा ठेवावा. किचन मधील भिंतींचा रंग हलका पिवळा किंवा लेमन कलर असावा. मॉर्निंग ग्लोरी शेड असल्यास उत्तमच. किचन ट्रॉली मधील ट्रॉल्या या अल्टरनेट ऑफ वाईट रेड किंवा ऑरेंज कलर मध्ये घ्या. किचन ओटा वरील सिंक पूर्वेकडे तोंड केल्यानंतर डाव्या हाताला म्हणजे ईशान्य दिशेला घ्यावे. अग्नेय दिशेला सिंक टाळावे. किचन ओटा वरील ग्लेज टाइल्सवर फळे व भाज्या यांची चित्रे लावावीत. डायनिंग टेबल हा किचन मधील नैऋत्य अथवा पश्चिम भिंतीजवळ ठेवावा. देवारा ठेवायचा असल्यास ईशान्य कोपरा घ्यावा. किचन ओटा वरील पूर्व दिशेची खिडकी ४×६ असावी उत्तर-दक्षिण पश्चिमेच्या खिडक्या ३×५ असाव्यात. किचन मध्ये पडद्याचा वापर टाळावा. किचन मध्ये आरसा लावू नये. किचनचा ब्रह्म तत्त्वाचा म्हणजे मधला भाग मोकळा ठेवावा. किचन मध्ये धारदार वस्तू उघडे ठेवू नये. किचनमध्ये ईशान्येकडे तांब्याचा मंगलकलश नियमित भरून ठेवावा. आग्नेय कडील किचन मध्ये उत्तर अथवा पूर्व दिशेला टॉयलेट नको. किचन मध्ये फिश टँक ठेवू नये. L आकाराचा ओटा नसल्यास रेफ्रिजरेटर आग्नेय कोपऱ्यात उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवा. L मोठा असल्यास तो पश्चिमेकडे ठेवावा. सिलेंडर आग्नेय दिशेकडे ठेवा वास्तु पुरुषाच्या निक्षेप खड्ड्यावर तो येणार नाही असे पाहावे….
—
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.