आजचे राशीभविष्य – मंगळवार – १७ नोव्हेंबर २०२०
मेष- मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या
वृषभ- भावनिक ताळमेळ तारेवरची कसरत
मिथुन- फायद्याची गुंतवणूक
कर्क- वाहन सांभाळा
सिंह- धार्मिक सहल
कन्या- गुडघ्याचे दुखणे सांभाळा
तूळ- शब्द हेच शस्त्र सांभाळून वापरा
वृश्चिक- गैरसमज नकोत- लॉन्ग टाइम लॉजिक हवे
धनु- भावनिक गुंतवणूक विचारपूर्वक करा
मकर- ज्येष्ठांचे आजारपण
कुंभ- व्यवसायिक टाइमिंग साधा
मीन- टुरिझम सप्ताह
………
शंकासमाधान
प्रश्न- प्रभाकर – राहू- केतू पौराणिक कथा काय आहे?
उत्तर- हिरण्यकश्यपुची बहिण सिहीका व वीप्रचिती यांचा पुत्र म्हणजे राहू. राहुला शंभर भाऊ होते. त्यापैकी सर्वात ज्येष्ठ राहू. राहू हा मंडलाकार असल्याने त्याला ब्रह्मा व इंद्राच्या सभेत मानाचे स्थान होते. सुरुवातीपासूनच राहूचे सर्वच मुख्य ग्रहाबरोबर वैर होते. आत्मारुपी सूर्य म्हणजे रवी व मन रूपातला चंद्र याला ग्रहण लावण्याचे काम राहू नियमित करतो. राहू जन्मताच फनीधर या नागाच्या स्वरूपात जन्मला त्याला काळसर्प असे म्हणतात. तो एक इच्छाधारी नाग होता. समुद्रमंथनातून मिळालेले अमृत सर्व देवता फक्त पिऊन टाकतील अशा विचाराने राहू देव रूपात देवतांच्या रांगेत बसून अमृत प्राशन केले. देवरूप धारण केलेल्या दैत्य राहुला अमृतप्राशन करताना सूर्य तसेच चंद्राने ओळखले. ही गोष्ट त्यांनी विष्णूचा लक्षात आणून दिली. विष्णूने तात्काळ सुदर्शन चक्राने राहूचा शिरच्छेद केला त्यातील शिराचा भाग राहु बनला तर अर्धा भाग समोर उडून केतू बनला. त्यामुळेच कुंडलीत नवग्रह मांडताना राहूच्या बरोबर सप्तमात म्हणजे समोर केतूचे स्थान असते. चंद्र सूर्यामुळे आपली अशी अवस्था झाली. यामुळे राहू हा सूर्य व चंद्राला ग्रहण लावतो. म्हणजेच कुंडलीतील सुर्य राहु युती तसेच चंद्र राहु युती ही अनिष्ट मानले जाते.
राहू हा भगवान शंकराच्या अधिकारातील गणितज्ञ तसेच यंत्री म्हणजे आजचा इंजिनियर होता. त्यामुळेच ज्यांच्या कुंडलीत राहु शुभकारक असतो ते लोक गणितात किंवा ख्यातनाम इंजिनिअर असतात. राहू द्वितीय पंचम अथवा एकादश ठिकाणी असल्यास व शुभयोगात असल्यास असा मनुष्य राजकारणात विविध पदांवर यशस्वी होतो. ज्योतिषशास्त्रात राहू व केतू ला आकाशस्थ ग्रह न मानता उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या छाया स्वरूप मानले आहे त्यामुळेच कुंडलीमध्ये राहू व केतू 180 अंश म्हणजे एकमेकांच्या समोर असतात. कुंडलीतील बारा भावांपैकी ज्या ठिकाणी राहू व केतू समोरासमोर येतात असे बारा प्रकारचे कालसर्प योग अथवा दोष यांचे वर्णन शास्त्रात आढळते. राहू व केतू हे जरी मुख्यता अडथळा आणणारे ग्रह आहेत असा समज असला तरी शल्यचिकित्सा, अभियांत्रिकी, आकडेमोड, नवनवीन उद्योग, निर्माण करण्याचे धाडस, खाणकाम, विद्युत उपकरणे निर्मिती, सत्ताकारण, शेअर मार्केट, औषध उत्पादन, चिकित्सा विज्ञान यामध्ये राहु व केतु च्या शुभयोग यामुळेच चौफेर यश मिळते. असे शास्त्रात सांगितले आहे….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.