आजचे राशीभविष्य – बुधवार – ७ ऑक्टोबर
मेष- शब्दांना लगाम द्या
वृषभ- योग्य तेच मत मांडा
मिथुन- खर्चाचा अंदाज चुकतील
कर्क- प्रवास योग
सिंह- नवी खरेदी
कन्या- ज्ञान दानाचा दिवस
तूळ- व्यक्त व्हावे
वृश्चिक- अर्ध डोकेदुखी संभवते
धनु- ज्येष्ठांना मदत
मकर- जेवढ्यास तेवढे करावे
कुंभ- मोठा निर्णय होईल
मीन- तुझे आहे तुजपाशी. जागा चुकलाशी
……..
शंकासमाधान
प्रश्न – कार्यकर – विविध रंग आपल्या मानसिकतेवर काय परिणाम करतात?
उत्तर- विविध रंग आपल्या मानसिकतेवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करत असतात. उदाहरणार्थ लाल रंग- हा मुल चक्राशी संबंधित आहे. मुल चक्र पाठीच्या कण्याच्या तळाशी असते. लाल रंगाचा संबंध जोम शक्ती, उत्साह, धैर्य, सातत्य, भावनिक व बौद्धिक पातळीवरील निर्णय क्षमता, इच्छाशक्ती प्रबळ करतो. नारिंगी रंग – हा रंग पानथरी चक्राशी संबंधित असून शारीरिक शक्तीत वाढ करतो. आशावाद, इच्छा वृद्धिंगत करतो. नैराश्य, भीती कमी करतो. अध्यात्मिक पातळी वाढवतो. पिवळा रंग- मज्जातंतू संबंधित रंग शरीराला उत्तेजित करणारी POSITIVE VIBRATIONS यातून निर्माण होतात. आनंदी वृत्ती, आशावादी विचार, निर्णय क्षमता, विचार कक्षा रुंदावणे, अवघड प्रश्नांची उकल या रंग लहरीमुळे होते. हिरवा रंग- हृदय चक्राशी संबंधित आहे. करुणा, प्रेम, दयाबुद्धी यांची वाढ, शारीरिक संतुलन, सत्याचा मार्ग, मतभेद मिटवणे, दुसऱ्याच्या अडचणी समजून घेणे, निसर्गप्रेम याविषयीच्या रंगलहरी यातून तयार होतात. निळा रंग- हा कसा चक्राशी संबंधित असून मानसिक शांती, ताण रहित शारीरिक अवस्था, आशावाद, आदर्शवाद, अंग झोकून काम करण्याची वृत्ती, जीवनाचे सूत्र जाणून घेणे, आपल्या वागण्यातून प्रेरणा निर्माण करणे ही या रंगाची वैशिष्ट्ये होत. जांभळा रंग- हा मस्तिष्क चक्राशी संबंधित आहे. सत्य, समर्पण, जबाबदारीची जाणीव, दुसऱ्यांच्या विचारांशी जुळवून घेणे, प्रगाढ मैत्री, मी पणाचा त्याग, समरसता आणि एकरूपता या रंगाचे वैशिष्ट्य आहे. गुलाबी रंग- हृदय चक्राशी संबंधित. हिरव्या रंगा पेक्षा कमी तीव्रतेच्या रंग लहरी यातून निर्माण होतात. आनंदी, उत्साही वृत्ती, सहकार्याची भावना, खेळकर वृत्ती, विनोदी स्वभाव, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आनंद लुटणे या रंगाची वैशिष्ट्ये आहेत. अशा पद्धतीने विविध रंग व त्यापासून मिळणाऱ्या शुभरंग लहरी आपली मानसिकता ठरवतात.
प्रश्न विश्वास महाराज- कोणत्या राशीने कोणत्या रंगाचा रुद्राक्ष वापरावा?
उत्तर- विविध रंगाचे रुद्राक्ष तसेच विविध मुखी रुद्राक्ष हे त्या त्या राशी मध्ये वापरले पाहिजेत. उदाहरणार्थ मेष रास पिवळा रंग. वृषभ पांढरा. मिथुन काळसर. कर्क पांढरा. सिंह पिवळा. कन्या तांबडा. तुळ काळसर. वृश्चिक तांबडा. धनू पिवळा. मकर तांबडा. कुंभ काळसर. मीन पांढरा.. रुद्राक्षाचे असे रंग जरी घालायचे असले तरी त्याची मुख संख्या, आकार, क्वॉलिटी हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पाहावे.
रत्न टीप-
पुष्कराज, माणिक, हिरा, मोती, पाचू या रत्न सोबत गोमेद, लसण्या, नीलम, पोवळे ही रत्ने एकाच हातामध्ये अथवा एकाच अंगठीत वापरू नयेत.
रुद्राक्ष टीप-
रुद्राक्ष शास्त्रामध्ये १४ मुखी रुद्राक्ष हा शिवशंकराचे नेत्र या स्वरूपात मांडला जातो. त्यामुळे तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घालावा.
ब्रेसलेट टीप-
व्याघ्राक्ष कवच, ब्रेसलेट हातात वापरतांना या संबंधातील सर्व नियम पाळावेत.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असल्याने शुभ कार्य टाळावीत..
…………………..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Nice