आजचे राशीभविष्य – बुधवार – ३ फेब्रुवारी २०२१
मेष – तर्क-वितर्क नको. सरळ मुद्द्यावर या
वृषभ – अपेक्षापूर्ती होईल
मिथुन – व्यवसायात वादातीत निर्णय
कर्क – प्रथम ऐकून घ्या मग बोला
सिंह – पहिले आप हे धोरण ठेवा
कन्या – तोल मोल के बोल
तूळ – ऐकीव माहितीवर मेहनत नको
वृश्चिक – टाईम टेबल नुसार काम करा
धनु – मध्यम मार्ग फायद्याचा
मकर – समजून घ्या मग व्यक्त व्हा
कुंभ – सुवार्ता मिळेल
मीन – चेहऱ्याचे आरोग्य सांभाळा.
……..
शंकासमाधान
प्रश्न- वरद – एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावरून त्याची रास ओळखता येते का?
उत्तर- देहबोली, व्यक्त होण्याची पद्धत, शब्द निवड, वागण्याची पद्धत यावरून तज्ज्ञ व्यक्ती रास ओळखू शकतात. उदाहरणार्थ, एखादा प्लॉटचा व्यवहार करायचा असल्यास मेष राशीची व्यक्ती पैशाची पूर्ण व्यवस्था झाल्याशिवाय चर्चेला जाणार नाही. मनासारखी बोली न झाल्यास ताडकन व्यवहारातून उठून जाईल… वृषभ राशीची व्यक्ती आत्ताच्या राहत्या प्लॉट पेक्षा नवीन प्लॉट मोठा व रोड फ्रंट घेईल. आसपास ग्रीनरी किती आहे ते बघेल…. मिथुन रास- नवीन प्लॉटची रिसेल व्हॅल्यू तसेच त्या भागातील सध्याची डेव्हलपमेंट याचा अंदाज बांधिल.. कर्क राशीच्या व्यक्तीला मेष अथवा सिंह राशीच्या व्यक्तीने धक्का दिल्याशिवाय प्लॉट खरेदीच्या भानगडीत पडणार नाही. सिंह रास- प्लॉट खरेदी झाल्यावर त्याच्यातले बारकावे प्रत्येकाला सांगेल. नंतर त्यांनी प्लॉट विषय काढला तरी लोक काढता पाय घेतात. कन्या रास – जो प्लॉट घ्यायचा आहे त्याच्या भोवती एकदा पायी, एकदा गाडीवर असे दिवसभरात दोन तीन चक्कर तरी मारेल. शेवटी घरातील मंडळी वैतागून प्लॉट घेण्याचे रद्द करतील. तूळ रास – प्लॉट घ्यायच्या अगोदरच अत्यानंदाने डोळे गाळत बसतील. नंतर प्लॉट घेता आला नाही या दुःखात डोळे गाळतील. वृश्चिक रास – प्लॉट घेताना प्लॉटचा संबंध नसलेल्या सर्वच विषयांवर वाद होईल. वादा वादात प्लॉट घेतला जाईल. धनु रास – प्लॉट घ्यायच्या आगोदर एखादे पारायण, कुलदैवताला जाऊन येणे, घरातील वरिष्ठांना प्लॉटवर घेऊन जाणे, प्लॉट मालक सुद्धा आपल्यासारखाच आहे याची खात्री झाल्यावर प्लॉट घेतात. मकर रास – आपण प्लॉट घेतल्यावर आपल्याला कोण कोण, काय काय बोलेल याचा अंदाज बांधत प्लॉट घेतात. कुंभ रास – आपण किती हालाअपेष्टेत दिवस काढले हे जवळच्या सर्वांना ऐकल्याशिवाय प्लॉट घेत नाहीत. मीन रास – यांना बाकीचेच लोक तुम्ही प्लॉट घेऊनच टाका म्हणून आग्रह होतो. इतरांच्या आग्रहाने व पसंतीनेच प्लॉट घेतला जातो.
हे एक प्रातिनिधिक उदाहरण दिले आहे. प्रत्येक व्यवहार करताना, चालताना, बोलताना, व्यक्त होताना प्रत्येक राशीची स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात. तज्ञ ती बरोबर ओळखतात.
….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
…
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे