आजचे राशीभविष्य – बुधवार – २४ फेब्रुवारी २०२१
मेष – दिवाणी व्यवहार सांभाळून करा
वृषभ – दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे होऊ नये
मिथुन – संवादातून ताण कमी करा
कर्क – कुटुंबातील सदस्यांना प्रोत्साहन द्या
सिंह – त्वरित मतप्रदर्शन करू नये
कन्या – शुभ प्रसंगाचा निर्णय
तूळ – मेहनतीला यश येईल
वृश्चिक – जुने वाद वाढवू नये
धनु – नवीन व्यक्तीशी संवाद सांभाळा
मकर – फायदा व नुकसान याचा अंदाज घेऊन व्यवहार करा
कुंभ – बोलताना सांभाळा
मीन – ताण तणाव व्यवस्थापन गरजेचे
………..
शंकासमाधान
प्रश्न- गणेश बापू – वास्तुशास्त्राप्रमाणे पंचतत्त्वांच्या पाच दिशांमध्ये कोण कोणत्या गोष्टी असाव्यात?
उत्तर – वास्तुशास्त्राप्रमाणे स्वतंत्र वास्तूसाठी मुख्य १० टिप्स पुढील प्रमाणे…
प्रवेशद्वार उत्तर पूर्व अथवा ईशान्य या भागात, स्वयंपाक घर आग्नेय भागात, त्यातही स्वयंपाक करणाऱ्यांचे तोंड पूर्व दिशेला, त्यातील पाण्याची जागा ईशान्य दिशेला घ्यावी. देवघर ईशान्य कोपऱ्यात घ्यावे. अंडरग्राउंड पाण्याची टाकी ईशान्य कोपर्यात तर ओव्हर हेड वॉटर टँक नैऋत्य दिशेला घ्यावी. टॉयलेट, बाथरूम दक्षिण-मध्य ते पश्चिम वायव्य या भागात घ्यावे. जिना देखील याच भागात घ्यावा. मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला घ्यावे, वास्तुमधील सर्वच बेड उत्तर-दक्षिण करून डोके दक्षिणेला करून झोपावे. वास्तूचे ब्रम्ह तत्व म्हणजे मधला भाग पूर्णपणे मोकळा ठेवावा. उत्तर पूर्व ईशान्य या भागातील नैसर्गिक उजेड हा दक्षिण पश्चिम नैऋत्य पेक्षा अधिक असावा. वास्तूच्या ब्रह्मतत्त्वात उभे राहून सर्व दिशा घ्याव्या. दिशा वास्तू टाळावी. दक्षिण-पश्चिम नैऋत्य अग्नेय या भागामध्ये आरसे लावणे टाळावे. उत्तर पूर्व ईशान्येला आरसे लावावेत.
—-