आजचे राशीभविष्य – बुधवार – २३ डिसेंबर २०२०
मेष- संयमित शब्द हवे
वृषभ- आदरातिथ्य करण्यात दिवस जाईल
मिथुन- दिवाणी दावे महत्वाचे
कर्क- देखल्या देवा दंडवत व्यक्ती भेटतील
सिंह- नामानिराळे होणाऱ्यांपासून सावधान
कन्या- मानापमान नाट्य
तूळ- मोठ्या संकल्पनासाठी सशक्त व्यवसायिक विचार हवेत
वृश्चिक- चांगल्या व्यक्ती दुरावण्याची शक्यता
धनु- कलाकौशल्य जपा
मकर- BIRD IN HAND ..BETTER THAN BUSH
कुंभ- गोड शब्दात कामे साधावी
मीन- फक्त मटेरियल सक्सेस नको.
……..
शंकासमाधान
प्रश्न- प्रणव- वास्तूमध्ये वाद-विवाद का टाळावेत?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू मध्ये असलेले चंद्रनाडी प्रवाह व सूर्यनाडी प्रवाह यांचा समतोल असणे आवश्यक आहे. हा समतोल जेव्हा नैसर्गिक रित्या साधला गेला असेल अशा वास्तूमध्ये राहणाऱ्यांनी आपापसातील वाद हेवेदावे भांडणे कुरबुरी या अवश्य टाळायला हव्यात. ज्यावेळेस भांडण होते त्यावेळी आपल्या शरीरातील नकारात्मक उर्जा लहरी अचानक वाढतात त्या आपल्या शरीरातील चंद्रनाडी प्रवाहावर आरुढ होऊन त्यांनाही नष्ट करतात. परिणामी अनेकदा सारासार विचार न होता एकमेकांना अद्वातद्वा बोलणे प्रसंगी हात उचलला अशा घटना या नकारात्मक प्रवाहांमुळे होतात. याची वारंवारता वाढल्यास मोठ्या वाईट घटना घडण्याचा संभव असतो. या नकारात्मक उर्जा लहरी वास्तु मधील सर्व घटकांवर परिणाम करतात. अशा ऊर्जा लहरींचा शारीरिक व मानसिक परिणाम बरेचदा पहावयास मिळतो. त्यामुळे वास्तुमधील वाद एकमेकांशी चर्चा करून सोडवावे त्याचा विपर्यास होऊ नये याची काळजी घ्यावी. लाख मोलाच्या आपल्या वास्तूतील शुभ ऊर्जेचे चंद्रनाडी प्रवाह आपणच परस्परांमध्ये वाद घालून नष्ट तर करत नाही ना याचा प्रत्येकाने विचार करावा.
……..
आजचा राहू काळ
सकाळी १२ ते दीड आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
https://indiadarpanlive.com/?cat=22