आजचे राशीभविष्य – बुधवार २ डिसेंबर २०२०
मेष- प्रमाणबद्ध नियोजन गरजेचे
वृषभ- नोकरी-व्यवसायात ताणतणाव
मिथुन- सेविंग नेचर फायद्याचे
कर्क- बोलण्यापूर्वी विचार करा
सिंह- गुंतवणुकीत मर्यादित फायदा महत्वाचा
कन्या- परिचितांना समजून घ्या
तूळ- शिक्कामोर्तब ला घाई नको
वृश्चिक- मखमली आठवणींचा हिंदोळा
धनु- कटू अनुभव
मकर- विश्वास ठेवल्यानेच काम होईल
कुंभ- समस्यांवर फार विचार नको
मीन- टाईम टेबल पाळा.
……..
शंकासमाधान
प्रश्न- विष्णू – वास्तुशास्त्र मधील ब्रह्म तत्व म्हणजे काय?
उत्तर- ब्रह्म तत्व म्हणजे आपल्या वास्तूचा सर्वात मध्यभाग. वास्तुच्या कार्पेट एरिया चे उभे तीन व आडवे तीन अशा भागांवर मार्किंग करून रेषा मारल्यास एकूण नऊ भाग होतील. त्यातील सर्वात मधला भाग हे संपूर्ण वास्तूचे ब्रम्ह तत्व होय. या ब्रह्म तत्वातील मधल्या भागाला CROSS देणाऱ्या दोन रेषा काढल्यास त्याला ब्रह्म बिंदू असे म्हणतात. वास्तुशास्त्राप्रमाणे ब्रह्म तत्व हे वास्तूचे हृदय होय. ब्रह्म तत्वावर कोणत्या प्रकारचे बांधकाम म्हणजे भिंत, टॉयलेट, बाथरूम, खड्डा, पाणी, खोलगट जागा, जिना, कॉलम अथवा कोणत्या प्रकारचा भार असू नये. ब्रह्म तत्त्वाचा संपूर्ण भाग हा शक्य असल्यास स्वतंत्र वास्तूमध्ये आकाशात व पर्यंत मोकळा सोडावा. वरती आकाश तत्वावर ब्रह्म तत्व इतकाच भाग ट्रान्सपरंट शीट टाकून आकाश ELEMENTS तेथील उजेड थेट खाली ब्रह्म तत्त्वावर पडेल, अशी वास्तुरचना करावी. ब्रह्म तत्वाचा संपूर्ण परिसर हा वास्तूच्या मध्यभागी असावा. ब्रह्म तत्व हे पूर्णतः किंवा PARTLY वास्तू डिझाईन कट मध्ये जायला नको. ब्रह्म तत्त्वावर अडगळीच्या सामानाची खोली बांधू नये.
….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.