आजचे राशीभविष्य – बुधवार – २५ नोव्हेंबर
मेष- योग्य शब्दात प्रत्युत्तर द्या
वृषभ- पाठीचे दुखणे डोके वर काढेल
मिथुन- व्यवसायिक अंदाज उन्नीस-बीस राहतील
कर्क- स्पष्ट शब्दात समस्या मांडा
सिंह- खाण्यापिण्याची विशेष काळजी
कन्या- विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये
तूळ- किसका सुने ओर किस्का ना सूने यावर वैचारिक गोंधळ..
वृश्चिक- आपलं काय चुकतंय यावर लक्ष केंद्रित करा
धनु- सुवार्ता मिळेल
मकर- बोलण्याच्या आधी विचार करा
कुंभ- धार्मिक विधी होतील
मीन- खर्चाच्या आधी विचार करा.
…
शंकासमाधान
प्रश्न- गणेश – गौरीशंकर रुद्राक्ष घेताना काय काळजी घ्यावी?
उत्तर- गौरीशंकर रुद्राक्ष अतिशय दुर्मिळ व अधिक मोल असलेला रुद्राक्ष आहे. हे दोन रुद्राक्ष नैसर्गिकरित्या एकत्र चिकटलेले असतात. अगदी सहजासहजी रुद्राक्ष विलग होत नाहीत. हे रुद्राक्ष गौरीशंकर स्वरूप अर्थात शंकर पार्वती स्वरूप मानले गेले आहेत. रुद्राक्ष थोडा छोटा व एक रुद्राक्ष थोडा मोठा असा असतो. रुद्राक्ष दुर्मिळ असल्याने बरेचदा काही लोक कृत्रिम रित्या चिटकवून अधिक दराने विकतात. गौरीशंकर रुद्राक्ष घेताना तो नामवंत ठिकाणाहून सर्टिफिकेट्स घ्यावा. त्याला चांदी कवचाने घडवून घ्यावे सिद्ध करून देव्हाऱ्यामध्ये ठेवावा अथवा योग्य ते रुद्राक्ष शास्त्र नियम पाळून गळ्यामध्ये धारण करावा.
…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.