आजचे राशीभविष्य – बुधवार – २८ ऑक्टोबर २०२०
मेष- अपेक्षापूर्ती होईल
वृषभ- अनामिक चिंता सतावेल
मिथुन- खर्चाचा ताळमेळ अवघड
कर्क- व्यवहारात कटुता टाळा
सिंह- फायद्याची गुंतवणूक
कन्या – ज्येष्ठांची नाराजी टाळा
तूळ- यशस्वी नियोजन
वृश्चिक- काळ काम वेग याचे नियोजन आजच मांडावे
धनु- अर्जंट की इम्पॉर्टंट ठरवण्यात गोंधळ
मकर- नवीन ओळखी फायदेशीर
कुंभ- फायद्याच्या संकल्पना
मीन- वेळेचा आदर करा
…………
शंकासमाधान
प्रश्न-राजेश- हस्तरेषा मधील मणिबंध अर्थात ROCKET LINE वरून काय अंदाज करतात?
उत्तर- हस्तरेषा मधील रॉकेट लाईन ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात. हातावरील अन्य LINES प्रमाणे रॉकेट लाईन देखील तज्ज्ञांना विविध प्रकारचे अंदाज करण्यास महत्त्वपूर्ण ठरते. प्रत्येकाच्या हातावरील रॉकेट लाईन्स वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. त्यामध्ये साखळी युक्त रॉकेट लाईन्स. संपूर्ण 3 स्वतंत्र रॉकेट लाईन्स. अडीच लाइन्स. लाईफ लाईन्सकडे वळलेल्या रॉकेट लाईन. जाळीदार लाइन्स. तुटक लाइन्स. फक्त पहिली डार्क लाईन. दोन डार्क लाईन. 3 डार्क लाईन. अथवा याउलट कॉम्बिनेशन. झिगझग रॉकेट लाईन्स. VARIATIONAL ZIGZAG आणखी विविध पद्धतीने मनिबंध रेषांचे स्वरूप व त्याचे आकार प्रकार यावरून विविध अंदाज करता येतात….
वास्तुपुरुष निक्षेप टीप
वास्तुशांती वेळी वास्तुपुरुष निक्षेप करताना वास्तूच्या मूळ आग्नेय दिशेचा कोपरा मध्ये 4 इंच बाय सहा इंच खड्डा करावा. त्यामध्ये वास्तुपुरुष प्रतिमा शलाका ध्रुव पंचरत्न आणि शेवाळ यांचा एकत्रित मातीच्या पेटीत निक्षेप करावा. त्या- त्या महिन्यामध्ये वास्तुपुरुष चा शिरोभाग योग्य त्या दिशा उपदिशांना करावा.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
—
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.