आजचे राशीभविष्य – बुधवार – २१ ऑक्टोबर २०२०
मेष- मान सन्मान
वृषभ- एकतर्फी निर्णय नको
मिथुन- सहकार्यांना विश्वासात घ्या
कर्क- शारीरिक पीडा
सिंह- मनसुबे सफल होतील
कन्या- चिंता टाळा
तूळ- क्षमतेचा पुरेपूर वापर करा
वृश्चिक- कल्पनेतले नकारात्मक विचार टाळा
धनु- आर्थिक अडचण सुटेल
मकर- आप्तेष्टांची आव भगत
कुंभ- मन मोकळ बोला
मीन- खर्च सांभाळा
……
शंकासमाधान
प्रश्न निरंतर- हस्ताक्षर किंवा सही यावरून व्यक्तिमत्त्वाचा अंदाज कसा करतात?
उत्तर- हस्ताक्षर किंवा सही वरून स्वभाव ओळखण्याच्या अंदाज शास्त्राला GRAPHOLOGY म्हणतात. यामध्ये अक्षर किंवा सहीचा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येतो. उदाहरणार्थ अक्षर अथवा सही यांचा झुकाव SLYDING कोणत्या बाजूला आहे, LEFT SLYDING …WRIGHT SLYDING…CENTRE ALIGN यापैकी कोणत्या प्रकारचे अक्षर आहे हे पाहिले जाते. त्यानंतर अक्षरातील शब्द लिहिण्याची पद्धत, लार्ज ..स्मॉल .. आवरेज यापैकी कोणती आहे हे पाहिले जाते. त्यानंतर स्पेसिंग यामध्ये एका अक्षरातील शब्दांचे एकमेकांमधील अंतर त्यासोबतच दोन अक्षरांमधील अंतर याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर फॉर्मेशन यामध्ये शब्द किंवा अक्षर लिहितांना ते अर्धवट लिहिले जाते की पूर्ण लिहिले जाते हे बघितले जाते. अशाप्रकारे अक्षर व सहीचा सर्व प्रकारे अभ्यास करून व्यक्तिमत्व, स्वभाव, स्वभावामुळे होणारे फायदे, तोटे, आर्थिक स्थिती, मानसिक शारीरिक कौटुंबिक स्थिती याचा ठोकताळा केला जातो.
मंत्रजप टीप-
मंत्र, जपा मध्ये मंत्राचे शब्द कोणतेही असो अंतर्मन, बहिर्मन त्याची सांगड घालून CO-ORDINATION विचारांच्या WAVES मध्ये सुसूत्रता आणणे हा मुख्य उद्देश असतो. एकदाही सुसूत्रता आली की माणूस स्वतः मध्ये स्थापित होण्याची कला आपोआप शिकतो. पुढे याच कलेच्या आधारे एकाग्रता वाढून हाती घेतलेल्या कार्यात आपण यशस्वी होऊ शकतो.
आजचा रंग
आजचा देवीच्या महावस्त्रचा रंग निळा आहे.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे…
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
—