प्रश्न – शिवानंद – वास्तू शास्त्राप्रमाणे उंबरठ्याचे महत्त्व काय?
उत्तर- पूर्वी प्रत्येक घराला लाकडी उंबरठा असायचा. त्याची जागा आता ग्रॅनाईट पट्ट्यांनी घेतली आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाला लाकडी चौकट असणे फार महत्त्वाचे आहे. परंतु खालच्या भागाला ग्रॅनाईट पट्टी लावल्यास ती चौकट न होता त्रिकट होते. लाकूड हे ऊर्जेसाठी NON-CONDUCTOR आहे. ज्यावेळी आपण बाहेरून घरात येतो त्यावेळी आपल्या पाया सोबत अनेक ठिकाणचे नकारात्मक प्रभाव वास्तूमध्ये प्रवेश करतात. वास्तुच्या मुख्य दरवाजावर जर खाली लाकडी उंबरठा असेल तर असे नकारात्मक प्रभाव पाया सोबत आत प्रवेश करत नाहीत. आजही घरातील ज्येष्ठ मंडळी बाहेरचे विचार बाहेर ठेवावे, शक्य असेल तर घराबाहेर पाय धुऊन मग घरात यावे, म्हणजे घरात शांतता घेऊन यावी, असे सांगत असतात.
उंबरठा हे त्याचे मूर्त स्वरूप आहे. उंबरठा संबंधात पौराणिक कथेतील नरसिंह अवतार व हिरण्यकश्यपू वध ही कथा आपणास माहित आहे. याचे प्रतिकात्मक रूप जरी गृहीत धरले तरी नरसिंहाने हिरण्यकश्यपूला उंबरठ्यावर ठार मारले होते. त्यातील हिरण्यकश्यपू हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. तर उंबरठा हा या नकारात्मक प्रभावाला समूळ नष्ट करणारे नरसिंह स्वरूप आहे, तर पौराणिक मान्यता नुसार हिरण्यकश्यपूचा वध केल्यावर आपल्या नखांची आग शमवण्यासाठी नरसिंहाने आपली नखे उंबर फळांमध्ये घातली. त्यानंतरच त्याचा क्रोध शांत झाला. असा सर्व प्रकारचा क्रोध शांत करणारे उंबराचे लाकूड दारात लावण्याचा पूर्वापार प्रघात आहे. त्यालाच उंबर-ठा असे नाव पडले.
………
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!