प्रश्न – गौरव – सुलेमानी हकीक रत्न व फिरोजा यामध्ये काय फरक आहे?
उत्तर – ८४ प्रकारचे उपरत्न वापरली जातात त्यामध्ये हकिक आणि फिरोजा ही सर्वाधिक वापरली जातात. मुख्य महाग असलेल्या नवरत्न याला पर्याय म्हणून ही उपरत्न वापरली जातात. हकिक सर्वच रंगांमध्ये उपलब्ध असतात. ज्या रंगाचे मुख्य रत्न असते त्या रंगाचा हकीक उपरत्न म्हणून दिला जातो. हकिक सर्वसामान्य रत्न आहे. चांदी अथवा पंचधातु मध्ये अंगठी किंवा मोठ्या आकाराचा हकिक पेंडंट ब्रेसलेट स्वरूपात वापरले जातात.
अनेक सेलिब्रिटींच्या हातात असलेले फिरोजा हे आकाशी निळसर रत्न आहे. इंग्लिश मध्ये टरकवाईस म्हणतात. टर्की देशातून मागवले जाते. अनेक सेलिब्रिटी हे रत्न वापरत असल्यामुळे या दशकामध्ये याची किंमत खूपच वाढली आहे. अंगठी किंवा ब्रेसलेट अथवा पेंडंट स्वरूपात फिरोजा चांदीमध्ये वापरण्याची पद्धत आहे. कोणताही हकिक वा फिरोजा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.
….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!